समाजीक कार्य,धम्म कार्य व (Result) परीणाम???

समाजीक कार्य,धम्म कार्य व (Result) परीणाम???

     *लाखो ₹ खर्च करुण समाजात कार्यक्रम आयोजित केले जातात कार्यक्रमाचे परीणाम (Result) काय? डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कार्यात वेळेनुसार बदल (Malty Dimensions Change) करत गेले. आज परीणाम (Result) ची गरज आहे आपला वेळ,बुद्धी आणि पैसा वाया जाऊ नये आपल्याला सुद्धा नियोजनात बदल करणे गरजेचे आहे परीणाम (Result) ची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आगरा येथील भाषणात खंत व्यक्त करतात की, मी "ग्रामीण भागातील लोकांकरीता" मोठ्या प्रमाणात कार्य करु शकलो नाही. समाज मागील ४० वर्षांपासून आपण धम्म व समाजीक कार्य करीत आहोत. आम्ही धम्म वारंवार त्याच शिक्षीत वर्गाला सांगत आहोत आणि हाच शिक्षीत वर्ग वारंवार धम्म ग्रहण करत आहेत, आता ह्या धम्म सांगणा-या व धम्म ग्रहण करणा-यांची नैतिक जबाबदारी असावी की आम्ही सर्वा शिक्षीत व प्रशिक्षीत अनुयायी यांनी ग्रामीण व झोपडपट्टी वस्तीत जाऊण स्वतंत्र पणे धम्म संस्कार वर्ग वा संडे मिशन, धम्मचर्चा, मार्गदर्शन असे सम्यक कार्य करणे गरजेचे आहे. धम्म प्रचार व प्रसाराची जबाबदारी केवळ बौद्ध भिक्खू ची नसुन, बौद्ध भिक्खू प्रमाणे सर्व प्रशिक्षीत अनुयायी यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊण सामाजिक कार्य धम्म प्रचार व प्रसालाला ग्रामीण व झोपडपट्टी वस्तीत प्रचार व प्रसार असे सम्यक कार्य करणे नितांत गरजेचे आहे. बुद्धिमान अनुयायी यांनी आपल्या बजेट मध्ये नियोजन करणे गरजेचे आहे सम्यक विचाराला कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे खरे परीणाम मिळायला मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?