श्रेष्ठदान
दान, दानदाते व श्रेष्ठदान:-
•••••••••••••••••••
अमरावती दि.६/१०/२०१९ राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यसिकेच्या स्नेहमीलन कार्यक्रमा करीता एतीहासिक दान देऊन आंदोलनावर विश्वास व्यक्त केला व कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता मदत केली त्या सर्वांचे आभार आपल्या दाना मुळे आंदोलनास आणखी बळ मिळाले दानदात्यांची यादी व त्या दानाचे महत्व जाणने आवश्यक आहे.
मिशन, संघटन मध्ये कार्य करतांना सर्वांचा सहभाग परीश्रम, मन आणि दान जे कमी अधिक प्रमाणात चळवळीला दिलं जाते असे सम्यक कार्य बहुतांश लोकं कमी अधीक प्रमाणत आंदोलनाला मदत करत असतात, वर्तमानात जे परिणामकारक कार्य दिसत आहे ते केवळ मात्र आपल्या दाना मुळे होय.
दान ही पारमिता आहे दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता इतरांच्या भल्यासाठी, त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता एखाद्याने आपली मदत, मालमत्ता, ज्ञान, रक्त, अवयव, व आपले प्राणदेखील अर्पण करणे म्हणजे दान होय. (केलेली मदत दुस-याला, समाजाला जाहिर रित्या सांगणे म्हणजे सम्यक दान नव्हे कारण दानात निरपेक्ष भावना या हाताची मदत त्या हाताला न कळने असे दान महत्वाचे असते.)
श्रेष्ठ दान कोणते???
व्यक्ति श्रीमंत आहे गाडी बंगला नोकरी,शेत जमीन, दाग दागीणे, असणारी व्यक्ति सम्यक मार्गाने अथवा अन्य मार्गाने कमावलेले असता जेव्हा दाण करतो तेव्हा ते दान त्याच्या संपत्तीचे 5% ही करत नसते, परंतु व्यक्ति दान करतो म्हणजे सम्यक उपक्रम करतो परंतु सर्वश्रेष्ठ दान नव्हे तर दुसरीकडे गावात, झोपडपट्टीत राहाणारी मजुरी, लहान रोजगार नोकरी करणारी दररोज हातावर कमाई करुन खाणारी निर्धन व्यकती सम्यक मार्गाची कमाईतील आपल्या घासातीला घास मुलभुत गरज अपुर्ण असतांना स्वतः दान देणारी व्यक्ती ही श्रीमंत व्यक्तिच्या तुलनेत श्रेष्ठ होय. श्रीमंत व्यक्तित पद, पैसा, प्रतीष्ठे मी पनाची हाव आणि लालसा असते यात काही अपवाद असतील; तर गरीब व्यक्ती लालसा रहीत दान करत असतो म्हणून गरीब व्यक्तीचे दान हे श्रेष्ठ दान होय.
आपल्या सारख्या दानदात्यांचा समाजास सार्थ अभिमान आहे.
Comments