जॅकमा चिन, याची दानशीलता व आमची विवेकशुन्यता..!!!
जॅकमा चिन, याची दानशीलता व आमची विवेकशुन्यता..!!!
🇮🇳🇮🇳☸🇮🇳🇮🇳
विपदेच्या प्रसंगी व्यक्ति आपली संपत्ती का देतो का दान करतो कारण जास्त पैसा आहे म्हणून नव्हे तर त्याचा समाजीक भाव हा उच्च कोटिचा व प्रगल्भ असतो जो समाजीक कार्याला प्राधाण्यक्रमाने मदत करत असतो. विपदेच्या प्रसंगी या प्रसंगी आमची, तुमची व सरकारचीच जबाबदारी अशा भावने ऐवजी या देशाला, समाजाला काय मदत करता येईल हे महत्वाचे आहे. कालपर्यंत मागणारे होतो परंतू आज प्रसंगानुरूप; समजूतीने सामाजिक योगदान या दृष्टिकोणातुन कार्य झाले पाहीजे.
देशात जागतिक विपदा असतांनी भारतात मास्क, सँनीटायझर चे निर्माते व काळाबाजार करुन पैसा कमावणे अशा भावनाशुन्य व अविचारी लोकांना बाजूला सारून निदान समाजात ज्यांचा विवेक जगृत आहे अशा लोकांनी किमान या विपदेच्या प्रसंगी काय मदत देता येईल? सामाजिक जागृती कशी करीता येईल, समाजाचे मनोबल वाढवने करीता काय योगदान देता येईल? आज मदतीची गरज आहे ज्याचे जिवंत उदाहरण म्हणजे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यवसायी जॅकमा ज्याने अमेरिकेत एक दशलक्ष फेस मास्क तसेच 500,000 चाचणी किट दान केल्या आहेत, आणि पुढे आफ्रिकेलाही मदत करणार आहे.
भारता कित्येक सेलीब्रिटी आहेत काही पुरस्कार प्राप्त अरबोपती, खरबोपती आहेत ज्यांची संपत्ती बेहीशोब आहे! अशा लोकांमध्ये दान भावनेचे बिज उत्पन्न व्हयला, विचार, विवेक व संस्कार निर्माण व्हयला आणखी वर्ष लागतील!
संकट व विपदे करीता जे ल़क रात्रंदिवस झटत आहेत ते सर्व महान होत. समाजातील प्रत्येक व्यक्तिने हातात हाताने घेऊन मजबूत श्रृंखला निर्माण करुन व्हायरसशी लढणे आवश्यक आहे आम्हाला या लढाई करीता आवश्यक संसाधनांची निर्मीती, दिलेल्या आचारसंहितेचे व योग्य सुचनांचे वेळोवेळी काटेकोर पालन केल्यास आम्ही या विषाणूस निश्चितच पराभूत करू शकु.
🙏🙏🙏🙏🙏
Comments