विहार तिथे अभ्यासिका
विहारे ज्ञानाची केन्द्रे होती! आपल्या विहारांना ज्ञानाची केन्द्रे बनवा;"विहार तिथे अभ्यासिका"ऐक परीणामकारक'निशुल्क' सामाजिक उपक्रम"*
*🌩 🦅🌩*
*🌧RJPA🌧*
🐘 🐃 🐎 🐆
☸☸☸☸☸
*सामाजिक कार्य,समाज सुधार व विचारधारा असा वारसा फुले,शाहु, आंबेडकरांनी समाजाला दिला, समाजात केवळ ठरावीकच व मोजकेच लोक समाजीक जाणीवेची, जाणीव ठेवून कार्य करीत असतात. मागील कित्येक वर्षात सामाजिक दाईत्वाची जबाबदारी समाजातील मोजकेच जाणकार कार्यकर्ते आणि अनुयायी यांनी वाहीली अशा सर्व महानुभावांचे खुप खुप आभार.*
*समाजात मोठ मोठे प्रशासकीय अधीकारी,कर्मचारी घडले यात समाजाला दिशा देणारे मोजकेच,मात्र आज वर्तमान परीस्तीत समाजातील सामाजिक जबाबदारी चे निर्वाहन करणारे, सामाजिक दृष्टिकोणाची जाणीव ठेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका (RJPA) परीवाराच्या च्या माध्यमातून समाजात प्रत्यक्ष जाऊन निरपेक्ष पने काम करणारे मोठ्य संख्येत कर्मचारी व मोजके प्रशासकीय अधीकारी जे RJPA आंदोलना व समाजाला परिणामकारक योगदान देत आहेत.*
*कर्मचारी,अधीकारी आपल्या अती व्यस्त कामकाजातुन समाजाला वेळ देऊ शकत असतील तर समाजातील अन्य वर्ग सुद्धा समाजात परिणामकारक कार्य करणे करीता आपले योगदान देऊ शकतात, व्यक्ति ची सामाजीक कार्य करण्याची निष्टा केवळ प्रामाणिक असली पाहीजे, दांभीकता, स्वार्थ व कार्य करण्याचे नाटक बाजुला सारून प्रत्येक सुजान कार्यकर्त्यांनी, सामाजिक घटकांनी सर्वसमावेशक सर्वांकरीता समता व भातृभाव हे ध्येय व उद्देश्य ठेऊन निस्वार्थ कार्य जे परिणाम देणारे कार्य (Result Oriented Work) केले तर सामाजिक संमन्वयातुन अमुलाग्र बदल घडवता येईल तसेच समजात आत्मविश्वास व बळ निर्माण होण्यास मलत होईल असे सम्यक कार्या करन्याकरीता आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करने गरजेचे आहे.*
*धम्म कार्य व समाजिक कार्य करणे केवल भन्तेजी,धम्मचारी, बौद्धाचार्यांचे तसेच समाजाचे सामाजिक कार्यकर्ते करने यांचेच कार्य नसुन अशी जबाबदारी समाजातील प्रत्येक सुजान व जागृत व्यक्तीचे नैतिक कर्त्तव्य आहे. धम्म प्रचार, प्रसार व समाजिक कार्य (Pay back to society) चा विचार केला तर मोजकेच लोक हे कार्य करत असल्याच लक्षात येतं. समाजात ज्यांचेकडे सामाजीकतेची जाणीव आहे व जो घटक परिणामकारकतेची जाणीव ठेवून तन,मन धन, काया,वाचा, मणाने समाजाला परिणाम देणारे कार्य (Result Oriented Work)करत असतील तर ही बाब समाजाच्या विकासाला चालना देणारी आहे.*
*समाजाचा समाजीक विकास, माणव कल्यान व जगाचा विकास हा केवल "बुद्धाचा धम्मच" करु शकते अशी डॉ.बाबासाहेबांची विचारधारा होती या विचारधारेला प्रत्यक्ष कृतीगत व जमीनीवर कामकरणे करीता "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका" २०१२ पासुन प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. "विहार तिथे अभ्यासीका" व "अभ्यासिका" या उपक्रमाला अनुसरु पाहता काल पर्यंत विहारात केवल विशिष्ट समुहच जात असे; भविष्यात समाजातील सर्वच घटक मोठ्या प्रमाणात विहारां मध्ये अध्ययन अध्यापन ज्ञान ग्रहण करायला येतील पुर्वी जसे नालंदा,तक्षशीला,विक्रमशीला,वंल्लभी व ओदंतपुरी येथे जगातील लोक अध्ययन अध्यापना करीता येत असत. भविष्यात समाजातील प्रत्येक घटक धम्म जाणुन घेतील समजुन घेतील ज्यामुळे भवीष्यात समाजीक घटक स्वयं प्रेरणेने जाणीवपूर्वक धम्म मार्गावर आरुढ होतील व समाजात स्वतंत्र,समता,बुधुता हे नैतिक मूल्य रुजवायला मदत होईल.*
*आंबेडकरी तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारी, समाजात समन्वय (Coordination) भातृभाव व ऐकोप्याची भावना निर्माण करनारी निरपेक्ष चळवळ "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका" उपक्रमा अंतर्गत, "विहार तेथे अभ्यासीका" विहारांना अध्ययन व अध्यापनाची केंन्द्र ,अभ्यासीकांना विहाराचे स्वरुप जेथे नैतिकता व परिणामकारक आचरणशीलता असेल! अशी अभ्यासीका चळवळच्या माध्यमातून समाजातील मुलभूत गरजांच्या पुर्ततेचा प्रयत्न अभ्यासीके मार्फत करुन समाजात धम्म प्रचार, प्रसार व अभ्याससंस्कृती असा सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोण जो सार्वभौमिक विकासाला, स्वतंत्र,समता,बंधुता,न्याय या माणवीय मुल्यांना रुजवुन सक्षम स्वाभिमानी समाजाचे प्रतीनीधी जे धम्म प्रचारक, प्रसारक, अभ्यासक व आचरणशील असा समाज घडवून महापुरुषांच्या विचारधारेचा समाज निर्माण करने असे ध्येय व उद्देश्य आहे. तेव्हा आज आपन करत असलेल्या आजच्या "Pay back to the society"अशा निस्वार्थ कार्याची जडणघडन भविष्याची खरी परिणामकारक फलश्रृती असेल.*
*नवीन "अभ्यासिका" करीता; व "विहार तिथे अभ्यासिका" सुरु करने करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका Core Members & Co-ordinators यांचेशी संपर्क साधावा*
☸☸☸☸☸
*RASTRAPITA JYOTIBA PHULE ABHASIKA*
*"A Movement For Building The Society"*
☸☸☸☸☸
Comments