EARNING AND LEARNING
रोजगार बंद, स्वयंरोजगार बंद, कामकाज मजूरी बंद सर्वकाही बंद असताना गरीब व गरजू विद्यार्थ्यी यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न व गरजुवंतांना जगवण्याचा प्रयत्न म्हणजे समाजात ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत अशा लोकांना हा प्रश्न प्राथमीक प्राधान्यक्रम देणारा वाटला. या समस्येच्या गर्तेत केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातील हातांवर कमावून खानारा वर्गही होरपळा गेला मदत करुन करुन किती करावी, मदत मागुन मागुन किती मागावी यावर समाजातील अत्यंत स्वाभीमाणी लोकांची बात औरच! एका वयोवृद्ध व्यक्तीला मदत दिली असता, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असल्याचे वक्तव्य करुन या परिस्थितीत उपलब्ध असलेला रोजगार होईल त्या पद्धतीने करण्याचा आग्रह धरत म्हणाले की, "जोपर्यंत शरीरात बळ आहे तोपर्यंत स्वतः जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे" जर वयोवृध्द व्यक्ती असा स्वाभिमानी विचार ठेवत असेल! हाच दुर्मीळ विचार आचरणात आणत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका शेगाव रहाटगाव अमरावती येथील विद्यार्थीनी शेगाव स्ट्रीट वर दुकान सुरू करुन या माध्यमाने दोन पैसे कमावणे, स्वावलंबनातुन रोजगार व शिक्षण घेणे असा उद्देश म्हणजे आजच्या तरुणाई...