बनावटी शुभेच्छा WhatsApp आणि facebook..!!!
🕯🕯🎂🕯🕯
*समाजात काही लोक जन्मदिवस,लग्नाचा वाढदिवस हे वैयक्तिक स्तरावर तर काही लोक सार्वजनिक स्तरावर (काही लोक स्वतःचा जन्मदिवस लग्नाचा वाढदीवस कधीच माहीती सुद्धा होऊ देत नाहीत याचे कारण काय?) साजरे करत असतात या प्रसंगी शुभेच्छा देणे ही खुप सकारात्मक भावणा आहे हे जरी खरे असले तरी गृप वर 200 पेक्षा जास्त लोक असतात काही एकमेकांचे परीचीत वा अपरीचीत असतात. अधीकांश शुभेच्छा देणारे स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना कधीही शुभेच्छा न देणारे लोक मात्र इतरांचे जन्मदिवस लग्नाचा वाढदिवस नोंदवून ठेवत असतात आणि न चुकता शुभेच्छा देत असतात विशेष बाब म्हणजे गृप मध्ये नसना-या व्यंक्तींनाही शुभेच्छा दिल्या जातात. काही लोक सामुहीक, झुंडीच्या माणसशास्त्रा प्रमाणे वागत असतात! कधी कधी चुकून एखाद्या व्यक्तीने शुभेच्छा मेसेज टाकला तर त्यामागे कुठल्याही खात्री न करता शुभेच्छा मेसेज धडकत असतात इतरही लोक मेंढरं वृत्ती प्रमाणे शुभेच्छा देत असतात काही त्याहीपेक्षा Belated शुभेच्छा देणारे वेगळेच असतात हे सर्व बनावटी व वरवरचे होत असल्याचे जाणवत असते शुभेच्छा स्विकारणारा व्यक्ती मात्र सुखावत असतात.काही लोक अजाणता व काही जाणीव पूर्वक प्रसिद्ध व्यक्ति,मोठ्या पदाचा व्यक्तिला त्याच्या जन्म दिवस, लग्नाचा वाढदिवशी अशा शुभेच्छा देत असतात व संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करत असतात आणि अस दर वर्षी सुरु ठेवत असतात जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जरी प्रत्येकाला आवडतं आणि ते आवशक सुद्धा असतं शुभेच्छा देणे व घेणे ही स्वतःची व त्या व्यक्तिची वैयक्तिक, खाजगी बाब असली तरी त्याचा गवगवा का व्हावा? खाजगी बाब सार्वजनिक का करावी? अन्य लोकांत तो व्यक्ती अपरीचीत असतांना इतरांना व्यत्यय का? यात काही विशिष्ट व्यक्ती बड्या पदांचे पदाधिकारी, धणीक, श्रीमंत व्यक्ती यांना नेहमी शुभेच्छा वर्षाव करीता धडपडत असतात कारणं त्यांचे कडून अपेक्षीत फायदा करून घ्यायचा असतो समंध जपायचे असतात अशी वृत्ती समाजात लाचारी निर्माण करण्यात कारणीभूत ठरत असते.*
*आंतरीक भावनेतून काही लोक शुभेच्छा व्यक्त करत असतात तर काही वर वर व स्वार्था करीता शुभेच्छा देत असतात मग शुभेच्छेचे प्रदर्शन सार्वजनिक का? सोशल मीडिया वरील अशा शुभेच्छा बऱ्याचदा औपचारिक कृत्रिम व आभासी असतात त्यामध्ये फक्त आभास निर्माण होतो खरी मैत्री होत नसते सर्व WhatsApp & facebook ग्रुप वर बहुतेक याच पद्धतचे सुरु असते अशा शुभेच्छा ह्या औपचारिक व रुक्ष ठरत असतात.*
*वारंवार व मोठ्या प्रमाणात गृप वर शुभेच्छा प्रेषित केल्याने अशा वेळेस त्या दिवसाला त्या क्षणाला चर्चिले जाणारे महत्वाचे विषय,विचारांचे आदाण प्रदाण दुय्यम ठरत असतात त्या मुळे विषय दुर्लक्षीत सुद्धा होत असतात, यावर पर्याय म्हणजे मध्यम मार्ग ज्याने गृप मधील इतर लोकांना व्यत्यय होणार नाही त्या ऐवजी त्या व्यक्तिला व्यक्तिगत वैयक्तिक संदेश टाकुण अथवा त्याना घरी जाऊन भेटणे किंवा ते शक्य होत नसेल तर किमान वैयक्तिक फोन करणे म्हणजे खरोखर मनापासून शुभेच्छा, भावणा, संवेदना तेवढ्याच उत्कटतेणे पोहोचवणे होय. वरील मत आज वाचायला,समजायला व आकलण व्हायला कठीण,अणुकरण करायला कालावधी लागेल परंतु भविष्यात समाजाला सामाजिक जाण ज्याने आपल्या मुळे अन्य लोकांना त्रास न होणे याचे भाण ठेवणे होय! वर नोंदवलेल्या मता प्रमाणे व्हावे वा वागावे असा अजिबात आग्रह नाही वास्तव,आभास आणि बनावट यामधील सत्य आपल्या पुढे यावं त्यामुळ विचार व्यक्त केला अर्थात, आपण सर्वांना काय वाटते हा आपल्या अभीव्यक्तीचा भाग होय कारण आपणही या विषयाला धरून मत मांडावे जे इतरांप्रमाणे मलाही वाचायला नक्कीच आवडेल.*
Comments