Mission Pay back to society
Mission Pay back to society
•••••••••••••••••••
*स्वतः घडुया! आणि समाजही घडवुया!*
🇸🇨🖋🇸🇨🖋🇸🇨
*सक्रिय अनुयायी यांचे करीता सम्यक कार्यक्रम म्हणजे,*
*"अभ्यासिका" व "विहार तिथे अभ्यासीका"*
🛣🛣🛣🛣🛣
*RJPA ऐक परीणाम कारक "निशुल्क" सामाजिक उपक्रम.*
📚📙📖📘📚
*समाजात निकाल देणारे (Result Oriented Work) परिणाम कारक कार्य होने आवश्यक आहे, सामाजातील सर्व अनुयायी यांनी आपल्या स्थानीक ठिकाणी, आपले जिथे वास्तव्य आहे अशा ठिकाणी केवळ पाच किंवा अधीक लोक जे राजकारण सोडुन, फक्त समाजकारण करु इच्छीतात (कारण फुले,शाहु,डॉ.बाबासाहेबांनी आधी समाजकारणच केले) अशे सक्रिय अनुयायी हे सम्यक कार्यात पुढाकार घेऊन सर्वां समावेशक कार्य, जे त्याग, समर्पणावर आधारीत जे पद, पैसा, प्रतीष्ठा,अहंकार त्यागुण केवळ निस्वार्थ पणे समाजाचा आधारस्तंभ होऊ इच्छीतात अशा सर्वांणी या सम्यक कार्याला गावात, खेड्यात,झोपडपट्टी, स्लम वस्तीत नव पिढी घडवायला वंचीत समाजाला मुख्य प्रवाहात आणने करीता प्रत्येकाणे स्वतः कार्याची धुरा खांद्यावर घेऊण जबाबदारी स्विकारुण सम्यक कार्याला दिशा द्यावी.*
*दिशाहीण कार्य म्हणजे अशी कृती वा भूमिका ज्यात ध्येय नसणे, अन्नवाटप, नास्ता वाटप, गोळधोळ वाटप, केक वापट, नाच गाणे, मनोरंजन अशा प्रकारचे कार्यक्रम नियोजित असतील तर मग आपण मागे वळुण पाहील तर आपण केलेल्या कार्याचा परीणाम काय? अशा कार्यक्रमाने समाज आपला बहुमूल्य वेळ, शक्ती, व पैसा वाया घालवत असते वरील कार्यक्रम हे हिंन्दु धर्मातील भंडारा वाटपा समान आहेत, आमचे आंदोलन हे ज्ञान वाटणारे आहे डॉ.बाबासाहेबांना डोक्यावर घेण्या ऐवजी डोक्यात घेणे गरजेचे आहे केवळ जयजयकार केल्या पेक्षा त्यांच्या कार्याचा रथ पुणे नेणे म्हणजे ज्ञानी समाज निर्माण करणारे आंदोलन होय समाजात असा कार्यक्रम जो अध्यक्ष, सचीव, कोशाध्यक्ष, सदस्य ही बाब तांत्रिक अडचणी दुर सारणे करीता आहे परंतु त्या ऐवजी सामाजिक भनगडी निर्माण करते ज्याने समाजाला अध:पतनाकडे नेण्यास मदत होते, अशा सर्व गोष्ठी त्यागुन या सम्यक कार्यात निस्वार्थ पणे स्वतःला व समाजाला सामील करुन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका (RJPA सामाजिक Model) जे ६ मे २०१२ बुद्ध पौर्णिमा या दिवसापासून विकसित झाले व आजपर्यंत ४५० चे वर समाजातील गरीब वंचित व गरजुवंत कुटुंब मुख्य प्रवाहात आले, ४००० लोकांणी अभ्यासिकेचा निशुल्क लाभ घेतला व २,००० विद्यार्थी आज निशुल्क लाभ घेत आहेत सोबतच डॉ.बाबासाहेब यांच्या विचारधारेचा व्यक्ती घडवून या धर्तीवर आपन सुद्ध समाजाला मदत करु शकतो त्याकरीता ध्येय व उद्देश्य.*
*विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबुद्ध भारत व सामाजिक सशक्तिकरण घडवत्याचे स्वप्न साकारने करीता आपल्या गवातील, शहरातील, वस्त्यामधील आपल्या विहारांना सामाजिक भवनांना अभ्यास केन्द्र बनवणे म्हणजे नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला, वल्लभी जी ज्ञानार्जना ची केन्द्र होती अशी संस्कृति निर्माण करणे होय. समाजात अभ्यास संस्कृती निर्माण करणे सोबत बौध्द तत्वज्ञान व आंबेडकरी विचारधारा घराघरात पोहोचवणे असा माणस आहे. विहारांना अभ्यासीका बनवने म्हणजे त्या स्थानीक विहाराच्या नियमीत कार्यात कुठलाही अडथळा न आणने होय असे कार्यक्रम नियमीत ठेऊण सामाजिक ध्येय साध्य करणे व विहारांना ज्ञानाची केन्द्र बनवने करीता प्रयत्न करणे होय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेको विहारांमध्ये असा उपक्रम सुरु आहे आपण सुद्धा आपल्या येथील विहारात असा उपक्रम सुरु करुन समाजाला हातभार लावावा. हा संदेश जागृत अनुयायी यांचे पर्यंत पोहोचवने सोबत समाजातील संपूर्ण विहारांना अभ्यासीकेच्या माध्यमातून ज्ञानाची केन्द्र बनवणे. या माध्यमातून समाजाला अभ्यासाची सवय व शिस्त लावुन अभ्यास संस्कृती निर्माण करणे करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेचा हा छोटासा उपक्रम आहे.*
*विहार तिथे अभ्यासीका या ऊपक्रमा अंतर्गत अनेक विहारां पर्यंत आपन पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपन सधम्म बुद्ध विहार मार्डी रोड,प्रशीक बुद्ध विहार ,संबोधी बुद्ध विहार दर्यापुर,परीवर्तण बुद्ध विहार देवगाव,सर्व जी.अमरावती. संघमित्रा बुद्ध विहार ,सुगत विहार,तथागत बुद्ध विहार,महाथेरो बुद्ध विहार,आलोक बुद्ध विहार,सर्व नागपुर, सिद्धार्थ बुद्ध विहार आर्वी,त्रिरत्न बुद्ध विहार ब्रम्हपुरी,त्रिशरण बुद्ध विहार, बुद्ध विहार साकोली,यासारखी अनेक विहारांमध्ये अभ्यासीका सुरु आहेत अभ्यासीका उपक्रमातुन आमच्या वस्ती ,नगर ,गावातुन जवळपास ४५० विद्यार्थी शासनाला व समाजाला सेवा प्रदाण करीत आहेत या ठिकाणची वर्तमान परीस्थीती बदलली आहे आपनही आपली व आपल्या परीसराची सामाजीक स्थीती बदलवु शकतो आणि म्हणुन येणा-या काळात सर्व विहारांमध्ये अभ्यासीका सुरु करण्याचा माणस आहे व समाजीक प्रगतीचे परीणाम कारक चित्र निर्माण करायचे आहे.*
*डॉ.बाबासाहेबांनी दिलेला संदेश व त्यास जाणनारा आचरणशील व शिलवान समाजाची जडण घडण होणे करीता अभ्यासीकेच्या माध्यमातून परिणाम कारक परीवर्तन करावयाचे आहे. या संकल्पने ला मुर्त स्वरूप देणे करीता "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका" विशेषत: समाजातील जबाबदार वर्ग जसे, प्रशासकीय अधीकारी IAS,IPS,IRS, तहसीलदार,पो.निरीक्षक,वकील, प्रध्यापक,डॉक्टर,कर्मचारी,निवृत्त अधीकारी,पत्रकार,सामाजीक कार्यकर्ता (RJPA) चे कोअर मेंबर्स, को-आँर्डीनेटर्स हे प्रामुख्याने कार्याला दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. समाजाच्या अशा पिढी घडवण्याच्या कार्यात समाजातील अधीकारी,कर्मचारी आणि बुद्धीवान आर्थीक संपन्न वर्गाने मोठया प्रमाणात सहभाग व योगदाण देत आहेत तसेच अन्य लोकांनी आपले योगदाण देणेे गरजेचे आहेत आणि ही आजची नितांत गरजही आहे, ज्याने समाजाचा लवकरात लवकर विकास आणि सामाजीक उद्धार होत्यास मदत होईल.असे कार्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीके सोबतच आपण सर्व समाजातील जागृत अनुयायी वर्गाने जबाबदारी स्वाकारणे गरजेचे आहे.*
*"विहार तेथे अभ्यासीका" हा उपक्रम राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीके द्वारा विद्यार्थी यांचे करीता पूर्णतः निशुल्क राबवत असलेला कार्यक्रम होय समाजातील प्रत्येक घटकाने या कार्याचे सहभागी बनणे व समाजाच्या या आपल्या हक्काच्या उपक्रमास अभ्यासीकेच्या कार्यास हातभार लावण्यास मदत करणे आवश्यक आहे, या करीता आपण अभ्यासीकेला आवश्य भेट द्यावी आपण आपल्या गावाची नगराची दशा निश्चित बदलवु शकतो म्हनुण आपल्या परिसरातील गरीब गरजुवंत विद्यार्थीस आजच त्यांचे भवितव्य घडवणे करीता नव निर्माण करणे करीता पुढाकार घ्यवा.*
*सोशल मिडीयावर WhatsApp, Facebook वर अहोरात्र मेहनत करणारे आता नक्कीच प्रत्यक्ष समाजात जाऊन परीणामकारक कार्य करतील तरच पुढे समाजाला आचरण करणारे प्रचारक,प्रसारक व अभ्यासक मिळतील, विहार तिथे अभ्यासीका हा उपक्रम "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेने" सुरुवात केलेली आहे या सम्यक कार्याला अधीक गतीमान करणे करीता प्रत्येकाणे यथायोग्य मदत करणे (Time Talent & Treasury) गरजेचे आहे. या सम्यक उपक्रमाचे माध्यमातून "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका" नक्कीच प्रयत्नशील आहे आम्ही आपल्या पर्यंत येत आहोत ,आत आपल्या सहकार्याची गरज आहे, संपर्का करीता (RJPA) राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेला आवर्जुन भेट द्यावी ही विनंती.*
अभ्यासिके च्या कार्याचा साक्षात्कार व्हिडीयो लिंक
: https://youtu.be/N8THvq_bKsY
https://youtu.be/1mxTJFHOH_Q
https://youtu.be/MqEKFAAuytQ
https://youtu.be/R-W7q9I_2zE
https://youtu.be/wD5UqZmNR8Q
https://youtu.be/JgwDWbev0Vw
https://youtu.be/zp_4ItiR1j4
*सवीस्तर माहीती करीता RJPA Websites ला भेट देऊन सवीस्तर माहीती घ्यावी ही विनंती.*
*Website:-*
www.abhyasikaa.com.
*संयोजक*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
*अभ्यासिका.*
Comments