मनोग्रह विस्तीर्ण आहे.
मनोग्रह विस्तीर्ण आहे. ‼️🎼🎼🎼‼️ सामाजात ऐकीव गोष्टींवर आंधळे पणाने प्रेम करणारे बहुसंख्य आहेत या विपरीत डोळसपणे व विषयाची कारणमीमांसा करणारे बोटावर मोजता येईल इतके आहे असे बहुसंख्य लोक आपलं वेगळं विश्र्व निर्माण करत असतात हे पिढीजात व रुढी व संस्काराच्या कुबड्या घेऊन मोठेच नव्हे तर म्हतारे होऊन गतप्राण देखील होतं असतात. अशा लोकांना आपल्या जीवनात आभासी,काल्पनिक व मृगजळीय माणसीकतेची सवय जडल्याने त्यांना काल्पनिक व मित्था गोष्टी जास्त समर्पक व चांगल्या वाटत असतात विषय आणि त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे वाटत नसते वाळवंटातील मृगजळाला पाणी समजणे, पाणी भरलेल्या काचेच्या पेल्यात टाकलेली काळी वाळकी दिसणे परंतु सत्य मात्र वेगळंच असते अशा लोकांचं आभासी जग हेच विश्व असते आणि इतरांनीही याच चाकोरीबद्ध वाटेवर जावं असं त्यांना अपेक्षित असते. वर्तमानात अशा वर्तनाची लोक बहुसंख्य अनुभवायास येतात जी समाजाला नकारात्मक वाटेवरुन नेत असतात यांना खरं,खोटं,बर वाईट हे महत्त्वपूर्ण नसते तर विशीष्ट व्यक्ती व समुदाय महत्त्वाचा असतो जनकल्याण हे नाममात्र असते म्हणजेच व्यक्ती व समुदाया...