सामाजिक गोलमेज परिषद अमरावती एक ऐतिहासिक पर्व
🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय कैशल्याच्या आधारे 1930,1931आणि 1932 अशा तिन गोलमेज परिषदा इंग्लंडला गाजवून देशा करीता, बहुजनां सोबतच सर्व समाजा करीताचा जाहिरनामा कमुनल अवार्ड रँमसे मेक्डोनाल्ड च्या माध्यमातून हक्क व अधिकार मिळवून दिले.या माध्यमातून आज केवळ समाजातील 13% लोकांना नोकरीच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी निर्माण झाले आणि त्याच्या कडे असलेली बचत शिल्लक ही त्यांना अमाप संपत्ती वाटू लागली उर्वरित 87% लोक अद्यापही हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या समाजाला आरक्षण नाही ते कसे प्रगतीशील झाले. काही विशिष्ट समाज आर्थिक दृष्टीने कसा सक्षम झाला आहे. काही समाज विविध क्षेत्रात चित्रपट, गित संगीत, वर्ग एक अधिकारी इत्यादी क्षेत्रात विशिष्टच समाज का? आणि तो कसा प्रगतीशील झाला याचे चिंतन अध्ययन करून एक लक्षात आले की, वरील समाजाने त्यांची त्यांची सामुदायिक प्रगती केली आहे. एखाद्या व्यक्ती डॉक्टर, वकील, इंजिनिअर,IAS,IPS,IRS,कर्मचारी अशी मोठी पदे प्राप्त केले असतील, मोठ्या डिग्री असतील ही त्या व्यक्तीची वैयक्तिक ओळख...