अधीकारी, कर्मचारी व भ्रष्टाचार


      Anti Corrosion Bureau (ACB) कर्मचारी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून भ्रष्टाचारी लोकांना सापड्यात पकडत असतात परंतु भ्रष्ट व्यक्ती ला वाटत असतं की,'माझ्या वर सापळा रचून फार मोठा अत्याचार केला आहे परिवाराचाही विचार केला नाही!आणि कार्यवाही केली'.भारतीय संविधानीक व कायदेशीर बाबी सुरळीत चालणें करीता व्यक्तींना शासकीय सेवेत संधी व प्रतीनिधीत्व प्रदान केली जाते.या करीता शासन आपल्या घरी येत नसतं की, शासकीय नोकरीत या म्हणून? आम्ही स्वत: भारतीय संविधानाचे शपथीवर नोकरी स्विकारली मग व्यक्तीच्या भ्रष्टाचारी कृत्यास तो व्यक्ती स्वत:च जबाबदार असतो ज्याचे परीणाम समाज व्यवस्थेला सोसावे लागतात.
    देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्याचा लौकिक म्हणुन महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षीही आपला क्रमांक कायम राखला आहे अनियंत्रित भ्रष्टाचाराने म्हणजे सामाजिक नैतिकतेचे पालन करण्या ऐवजी अध:पतन झाले असुन जे अव्यवहारिक आहे त्याचे प्रती नाव म्हणजे भ्रष्टाचार होय. भौतिक सुख मिळविण्याच्या नादात करावे लागलेले अनैतिक कृत्य व सर्व भौतिक सुखाची हाव व त्याबाबत जास्त लोभ मोह न आवरल्याने श्रीमंत नौकरदार अवैध मार्गाने भौतिक सुखाच्या आहारी जातो व भ्रष्टाचाराचे कळस गाठतो.
    शासकीय कर्मचारी आणि श्रीमंत  जास्त माया जमवणे करीता अनैतिक मार्गाने अर्थात भ्रष्टाचार करणे करीता आर्थीक चोरी, पैशा करीता नैतिकता ढासळवणे, पैशा करीता खोटे बोलने व याला आळा घालणे करीता कायदे, नियम, शपथ, प्रतीज्ञा या प्रतीबंधात्मक उपाय योजना करण्यात आली आहे.
   महाराष्ट्र शासनाने कर्मचा-यां करीता शासन परीपत्रक 2001 नुसार दि.31 अक्टोबर ते 06 नव्हेबर हा आठवडा "दक्षता जागृती सप्ताह" म्हणुन पाळल्या जातो आणि सर्व लोकसेवकां द्वारा प्रतिज्ञा व शपथ घेतली जाते ती अशी...
              *प्रतिज्ञा*
आम्ही भारताचे लोकसेवक याद्वारे गंभीरपुर्वक अशी प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शीकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करु. आम्ही अशीही प्रतीज्ञा करतो की, जिवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भष्ठाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वतोपरी कर्य करु. आम्ही दक्ष राहुन आमच्या संघटनेच्या वृद्धीसाठी व लौकीकासाठी कार्य करु. आमच्या सामुदायीक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करुन देऊ आणि आमच्या देशबांधवांना मूल्याधिष्टीत सेवा पुरवू. आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडु आणि भय किंवा पक्षपात या विना कार्य करु......
       भ्रष्टाचार मुक्त समाज नर्माण करणे करीता कायदा आपले कर्तव्य बजावत असतांना मात्र National Crime Report Bureau ने जारी केलेला अहवाल देशवासीयांना धक्के देणारा आहे. देशातील भ्रष्टाचाराच्या एकूण प्रकरणांपैकी 22.9 % घटना महाराष्ट्रातील आहेत. ACB च्या सापळ्यात 698 कर्मचारी व खासगी व्यक्ती अडकले तर 947 आरोपी जाळ्यात अडकले ज्यात वर्ग-1 (Class one officer) 47अधिकारी अडकले.
    प्रतिज्ञा,कायदे,नियम आणि धर्माने राष्ट्र निर्माण होईल? समाज भ्रष्टाचार मुक्त होऊन, समाज व व्यक्ति अत्यंत प्रामाणिक कसा बनेल? प्रत्येक वर्षी लोकसेवक प्रतिज्ञा घेतात परंतु आचरणाच्या अभावाणे भ्रष्टाचार मुक्त समाज घडण्यात अडथडा होतो परंतु साधा व सोपा उपाय म्हणजे खालील पाच मूलतत्वे ज्याने निश्चित सामाजात अमुलाग्र बदल होण्यास मदत होईल ती खालील प्रमाणे.
*पाच मूलतत्वे:-*
1)जीवहत्ये पासून विरक्त असणे
2)चोरी पासून विरक्त असणे
3)अनीती पासून विरक्त असणे
4)खोटे बोलण्या पासून विरक्त असणे
5)मद्यपाना पासून विरक्त असणे
   *ह्यापैकी प्रत्येकासंबंधी असे कि, हत्या करु नये, चोरी करु नये, खोटे बोलु नये, वैषयिक अनीती करु नये, आणि मद्यपान करु नये
   नैतिकते व ज्ञानाचा उपयोग; सोबत माणसांच्या शीलावर अवलंबुन आहे शीलाशिवाय ज्ञान मुल्यहीन आहे,  शीलाशिवाय या जगात दुसरे काही नाही शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणुन आपले शील शुध्द असणे महत्वाचे आहे. प्रत्येक धर्म नीतीचा उपदेश करतो परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मुळ आधार नव्हे केवळ नैतिकता पुरेशी नाही ती पवित्र व शिलाचरण युक्त आणि सर्वव्यापी असली पाहीजे.
*सवीस्तर माहीती करीता...*
नैतिकता,प्रज्ञा,शिल,मूलतत्वे करीता *"बुद्ध आणि त्यांचा धम्म"* हा ग्रंथ अभ्यासावा.

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?