दानाचा उपयोग होने गरजेचे आहे

मात्र 20 दिवसांत "विहार तिथे  अभ्यासिका"आंदोलनास, अधिका-यांनी धम्म दान देऊन नाशिक येथे अभ्यासिका निर्मितीचा संकल्प
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
*जर्मनी येथून आयु.राजेश गावंडे साहेबां द्वारे धम्म दान*
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
    *नाशिक येथे अभ्यासिका सुरु करणे करीता भारतातीय अधिका-यां सोबत प्रामुख्याने जर्मनी येथूनही आयु.राजेश गावंडे सर (IFS)अधिकारी यांनी ही धम्म दान करून अभ्यासिका निर्मितीचा संकल्प अधिका-यांकडून करण्यात आला. बौद्ध संस्कृतीत दानाला फार महत्व आहे जे दुसर-यांच्या हिताकरीता आपले स्वत्व सोडण्याचे नाव दान होय, दानपारमिता जे पुन्य कर्म आहे आपल्या उत्पन्नाचा काही भाग गरीब व गरजुवंतांच्या हितार्थ लावणे म्हणजे सम्यक कृती होय.*
*मिशन,आंदोलन, संघटन मध्ये कार्य करतांना अनुयायी कार्यकर्ते यांचा सहभाग नेहमीच असतो बहुतांश लोकं आंदोलनाला बुद्धी, वेळ व आर्थिक मदतही करत असतात, अभ्यासिकेचे वर्तमानात जे परिणामकारक कार्य दिसत आहे त्याचा पाया म्हणजे आपल्या सारखे दानदाते लोक होत.*
    *धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या एका दान्याला जमिनीमध्ये नष्ट व्हावे लागते. आज आपण सर्वांनी जमीनत नष्ट होणाऱ्या दाण्याची भूमिका वठवली आहे. उद्या अभ्यासिकेतुन हजारो कणीस निर्माण होतील जे विहारांचे व समाजाचे संगोपन करतील.*
   *सम्यक संकल्प,संस्कार व शिक्षन अनुकरण करायला हजारो वर्षे निघून जातात परंतु आपल्या शिक्षणाचा उपयोग वंचित, पिढीत लोकांच्या उद्धारा करीता न करता अपली नौकरी भली, बायको,लेकर भले या भावनेने आजच्या वर्गास ग्रसित केले आहे असे वर्तन समाजास हानिकारक आहे. सक्षम वर्गाने गरजुवंत,पिढीत समाजाची सेवा केली पाहिजे ज्याने समाजाचे, अज्ञानामुळे निर्मीत शोषण व अन्याय थांबला जाऊं शकतो ज्यामुळे समाजाचे, विद्यार्थाचे उत्थान अंर्तभूत आहे जे आपल्या प्रयत्नाने अभ्यासिका आंदोलन साकारले जाणार आहे.*
    *राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यसिका आंदोलन करीता एतीहासिक दान देऊन आपण आंदोलनावर विश्वास व्यक्त केला; वर्तमानात जे परिणामकारक कार्य दिसत आहे ते केवळ आपल्या सारख्या दानदात्यां मुळे आहे. आंदोलनाला मोठ करणाऱ्या आपल्या सारख्या दानदात्यांचा समाजास सार्थ अभिमान आहे.*
  *राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आणि विहार तिथे अभ्यासिका या निशुल्क उपक्रमा द्वारे वंचीत व गरजूवंत विद्यार्थीना अभ्यासिका उपलब्ध करुण त्यांच्या जीवनात अमुराग्र बदल घडवुन समाजात आचरणशील माणुस घडवणे या ध्येयावर कार्य करणे होय. दानदात्यांचे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिके तर्फे हार्दिक आभार.*
☸☸☸☸☸
       *RJPA*
✅✅✅✅✅
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका. अधीक माहीती करीता*
*Website:-*
👇👇👇http://www.abhyasikaa.com
         🙏🙏🙏
          *सौजन्य:*    
   राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
        *अभ्यासीका*

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव