देवाच्या अस्तित्व खगोल - भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स

देवाच्या अस्तित्वाबद्दल खगोल - भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स लिहितो

देव या विश्वाचा निर्माता आहे काय ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो.  मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. बिग ब्यांग स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार ? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे . पृथीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे . पृथ्वी गोल आहे . त्याला कडा नाहीत . सीमा नाहीत . तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे .

अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच - मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वात नाही .

यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून  घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे.

स्टीफन हॉकिंग्स .
(मृत्यू - १४ मार्च २०१८)

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव