अभ्यासिका आंदोलन
ऐक परीणामकारक निशुल्क सामाजिक उपक्रम...
•••••••••••••••••••
🌩 🦅🌩
🌧RJPA🌧
🐘 🐃 🐎 🐆
☸☸☸☸☸
सामाजिक कार्य, समाज सुधार व विचारधारा असा वारसा फुले,शाहु, आंबेडकरांनी समाजाला दिला, समाजात केवळ ठरावीकच व मोजकेच लोक समाजीक जाणीवेची, जाणीव ठेवून कार्य करीत असतात. मागील कित्येक वर्षात सामाजिक दाईत्वाची जबाबदारी समाजातील मोजकेच जाणकार कार्यकर्ते आणि अनुयायी यांनी वाहीली अशा सर्व महानुभावांचे खुप खुप आभार.
समाजात मोठ मोठे प्रशासकीय अधीकारी,कर्मचारी घडले यात समाजाला दिशा देणारे ,कार्य करणारे मोजकेच! मात्र आज वर्तमान परीस्तीत समाजातील सामाजिक जबाबदारी चे निर्वाहण करणारे, सामाजिक दृष्टिकोणाची जाणीव ठेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका (RJPA) परीवाराच्या च्या माध्यमातून समाजात,ग्रामीण भाग,स्लम वस्ती गरजुवंतां पर्यंत प्रत्यक्ष जाऊन निरपेक्ष पणे काम करणारे प्रशासकीय अधीकारी म्हणजे मा.डॉ.प्रवीणकुमार (IPS), मा.संदीप तामगाडगे (IPS), मा.धीरज कुमार (IAS), मा.डॉ.प्रशांत रोकडे (IRS), मा.विजय शेडे (Ass. Director),असे बरेच प्रशासकीय अधीकारी व सर्व स्तरातील कर्मचारी समाजाला मोठे योगदान देत आहेत.
वरील प्रशासकीय अधीकारी जर आपल्या अती व्यस्त कामकाजातुन समाजाला वेळ देऊ शकतात तर मग समाजातील अन्य संपन्न वर्ग समाजा करीता आपले योगदान सुद्धा निश्चितच देऊ शकतो, व्यक्ति ची सामाजीक कार्य करण्याची निष्टा केवळ प्रामाणिक असली पाहीजे, दांभीकता,स्वार्थ,प्रतीष्ठा,अहंकार ठेऊण कार्य करण्याचे नाटक बाजुला सारून प्रत्येक सुजान कार्यकर्त्यांनी,सामाजिक घटकांनी सर्वसमावेशक सर्वांकरीता समता हे ध्येय व उद्देश्य ठेऊन निस्वार्थ कार्य जे परिणाम देणारे कार्य (Result Oriented Work) केले पाहीजे,जे सामाजिक संमन्वय साधुन मेहनत करुन समजात आत्मविश्वास,ताकद व बळ निर्माण करन्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
धम्म कार्य करणे केवळ भिक्खु ,धम्मचारी वा बौद्धाचार्यांचे तसेच सामाजिक कार्य करणे केवळ सामाजिक कार्य करणा-यांचे कार्य नसुन ही जबाबदारी समाजातील प्रत्येक सुजान व्यक्तीची नैतिकता जबाबदारी आहे.धम्म प्रचार, प्रसार व समाजिक कार्य (Pay back to society) चा विचार केला तर मोजकेच लोक हे कार्य करत असल्याच लक्षात येतं. समाजात ज्यांचेकडे सामाजीकतेची जाणीव आहे व जो घटक परिणामकारकतेची जाणीव ठेवून तन,मन धन, काया,वाचा, मणाने समाजाला परिणाम देणारे (Result Oriented Work) वा न्याय देण्याचा प्रयत्न करत असतील तर ही बाब समाजाच्या विकासाला चालना देणारी आहे.
समाजाचा समाजीक विकासच नव्हे तर माणव कल्याण व जगाचा विकास हा केवल "बुद्धाचा धम्मच" करु शकते अशी डॉ.बाबासाहेबांची विचारधारा आहे या विचारधारेला प्रत्यक्ष कृतीगत करणे करीता "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका" 6 मे 2012 पासुण निस्वर्थपणे प्रामाणिक कार्य करीत आहे. "विहार तिथे अभ्यासीका" व "अभ्यासीका" या उपक्रमाला अणुसरु पाहता काल पर्यंत विहारात केवल विशिष्ट समुहच जात असे भविष्यात समाजातील सर्वच घटक मोठ्या प्रमाणात विहारां मध्ये अध्ययन अध्यापन करायला धम्म शिकायला येतील जसे, नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला, वंल्लभी,ओदंतपुरी येथे जगातील लोक अध्ययन अध्यापना करीता येत असत. भविष्यात समाजातील प्रत्येक घटक धम्म जाणुन घेतील समजुन घेतील ज्यामुळे भवीष्यात समाजीक घटक स्वयं प्रेरणेने जाणीवपूर्वक धम्म मार्गावर आरुढ होतील व समाजात स्वतंत्र, समता, बुधुता हे नैतिक मूल्य रुजवायला मदत होईल.
आंबेडकरी तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारी समाजात भातृभाव व समाजात ऐकोप्याची भावना निर्माण करनारी निरपेक्ष चळवळ "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका" होय, "विहार तेथे अभ्यासीका" विहारांना अध्ययन व अध्यापनाची केंन्द्र ,अभ्यासीकांना विहाराचे स्वरुप जेथे नैतिकता व परिणामकारक आचरणशीलता असेल, अशा अभ्यासीका चळवळच्या माध्यमातून समाजातील मुलभूत गरजांच्या पुर्ततेचा प्रयत्न अभ्यासीके मार्फत करुन समाजात धम्म प्रचार, प्रसार व अभ्याससंस्कृती असा सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोण जो सार्वभौमिक विकासाला, स्वतंत्र,समता,बंधुता,न्याय या माणवीय मुल्यांना रुजवुन सक्षम स्वाभिमानी समाजाचे प्रतीनीधी जे धम्म प्रचारक, प्रसारक, अभ्यासक व आचरणशील असा समाज घडवून महापुरुषांच्या विचारधारेचा समाज निर्माण करने असे ध्येय व उद्देश्य आहे. तेव्हा आज आपन करत असलेल्या आजच्या "Pay back to the society"अशा निस्वार्थ कार्याची जडणघडन भविष्याची खरी परिणामकारक फलश्रृती असेल.
नवीन "अभ्यासिका" करीता व "विहार तिथे अभ्यासिका" सुरु करने करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका Core Members & Co-ordinators यांचेशी संपर्क साधावा
☸☸☸☸☸
RASTRAPITA JYOTIBA PHULE ABHASIKA
"A Movement For Building The Society"
☸☸☸☸☸
Share the Mission...
Comments