संघटन विश्वास व दान
आंदोलनाला समाज दान केव्हा प्रदान करते..? "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेला" समाज स्वतःहुन दान का देते?
*सामाजिक कार्य व धम्मकार्य करत असतांना कार्यकर्ता, अनुयायी व संघटना यात सुक्ष्म विचारभेद होत असतात ते दुर सारल्या गेले नाही तर त्याचे रुपांतरण मतभेदात होत असतात ज्यामुळे आंदोलनाची अपरीमीत हाणी होत असते. मतभेद दूर सारणे करीता व सामाजिक उत्थाना करीता दोन पवल मागे आल्यास समाजाला अधिक लाभ होत असतो. समाजातील मतभेद व गैरसमज दुर करण्या करीता अभ्यासिका कोआँर्डीनेटर निरंतर प्रयत्न करीत असतात व समाजाचा विश्वास संपादन करत असतात.*
*सामाजिक कार्य करतांना जमीनीवर प्रत्यक्ष कृती करणे महत्वाचे आहे "राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिका" व "विहार तिथे अभ्यासिका" या "निशुल्क" सामाजिक उपक्रमाचे कोआँर्डीनेटर आणि विद्यार्थी यांच्या कर्तव्याला व अनुभवाला अनुसारुन 2012 पासुन शासनाचा कुठल्याही निधी न घेता फक्त सामाजाच्या दाणावर महाराष्ट्रात विवीध 48 ठिकाणी अभ्यासिकेच्या माध्यमातुन समाजाला निस्वर्थ व निशुल्क सेवा देत आहेत याचा परिणाम म्हणजे कोआर्डिनेटर व कार्यकर्ते यांनी साधलेल्या समाजिक समन्वयाचे जिवंत उदाहरण होय.*
*आपण जिथे सामाजिक कार्य करत असतो तिथे प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत जबाबदारी घेणे ऐवजी सामूहिक जबाबदारी TEAM WORK ने कार्य करणे महत्वाचे असते जे Team work कार्या ऐवजी वैयक्तिक One man armi ने कार्य करतात ते मात्र श्रेय प्राप्ती करीता धडपडत असतात. मी, माझेद्वारे, वैयक्तिक, स्वतः, हे विशेषन लाऊण कार्य करणा-या व्यक्ति या त्यांच्या अपरीपक्व भुमीकेमुळे नवीन कार्यकर्ता प्रचारक व प्रसारक निर्माण होण्यास बाधा उत्पन्न होते असते जर सामूहिक कार्य Team work ने घडले तर त्याचा परिणाम निरंतर टिकणारा असतो.*
*1)समाजाचे नेतृत्व करणारे नैतिक व अभ्यासु व्यक्तिमत्व जे सम्यक दृष्टि ठेऊन नेहेमी धम्मकार्य व सामाजिक कार्यास प्राधाण्यक्रम देऊण व पुढाकार घेऊण जबाबदारी स्विकारणारे असतात ज्यात सामाजिक कार्यकर्ता, कामगार, अधीकारी, कर्मचारी, व्यवसायी इत्यादी आचरणशील व्यक्ति समाजाला नेतृत्व प्रदान करुन परीणामावर लक्ष केन्द्रित करुन कार्य करत असतात यामुळे ते समाजास मजबूती प्रदान करुन धम्म चक्र गतीमान करण्यास मदत करत असतात अशा गतीशील व सम्यक कार्याला पाहुन समाज स्वतः पुढाकार घेऊन दान देत असतात*
*2)संघटनेत अध्यक्ष,सचीव पदाधिकारी हे तांत्रिक प्रश्न सोडवणारी भौतिक व्यवस्था होय. ही व्यवस्था फक्त तांत्रिक बाब सोडवणे करीता असते समाजाला या शुल्लक बाबीला महत्त्व न देता विवाद, भांडण न करता आंदोलन निरंतर पुढे नेत असतात, समाज आंदोलनावर संपूर्ण विश्वास ठेवत असतात तेव्हा समाज संघटनेला दान देत असतात.*
*3)संगठन कार्यातुन स्वतःला काहीच मिळनार नाही, आम्हाला समाजाला केवळ द्यायच आहे हे सत्य स्विकारुण समाजात कार्य केल्यास, पद पैसा प्रतीष्ठा अहंकार बँनर, पोस्टर, प्रसिद्धि हे सर्व सोडुन केवळ संगठन कसे मजबूत करता येइल, आंदोलनाचे प्रचारक प्रसारक, अभ्यासक कसे निर्माण करता येईल, समाजाला Time Treasury & Talent कसे देता येईल, आंदोलनाकरीता शासनाचा कुठलाही फंड न घेता कोआँर्डीनेटर स्वतः उत्पन्नाचा 20 वा भाग 5% समाजाला प्रदाण करता येईल, Payback to Society या तत्वावाचे आचरण, प्रसंगी समाजा करीता त्याग,समर्पण करुन समाजात स्वतःचा आदर्श निर्माण करून कोआँर्डीनेटर, कार्यकर्ते, अनुयायी वरील आचरणाने समाज आंदोलनास सहकार्य करत असतात असे सकारात्मक व प्रेरणादायी कार्य आधी कोआँर्डीनेटर स्वतःला सामाजिक कार्या करीता झिजवून आपल्या केलेल्या कार्यातुन निकाल व परीणाम दाखवून स्वतः ला सिद्ध करुन दाखवल्यास समाज स्वतः दाण, बुद्धी, परीश्रम संघटनेस प्रदाण करीत असतात.चला आजच आपण अभ्यासिका व विहीर तिथे अभ्यासिका समाजव तरुणांना घडवने करीता आपल्या कार्यास निस्वार्थ पणे सुरुवात करुया व डॉ.बाबासाहेबांचे कार्य अधीक गतीमान करणे करीता नवतरुणात नवचैतन्य निर्माण करु या!*
💐💐💐💐💐
*आपल्या विहार अभ्यासिका सुरु करणे करीता संपर्क करा*
*(निशुल्क सामाजिक आंदोलन)*
🛣📚📘📖✍
*सौजन्य*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
*अभ्यासिका*
Comments