सामाजिक बदल

सामाजिक बदला करीता आपल्याला टिम वर्क ने कार्य करीत राहावे लागेल...संवैधानिक नैतिकते प्रमाणे!
●●●●●●●●●
*गरीबांना अन्नदान, कपडे वाटप वा दान वा वाटपयुक्त मदतीचे कार्य जरी महत्वपूर्ण असले तरी त्या व्यक्तिवर, समाजावर तशी वेळच येऊ नये, अशी सामाजिक व आर्थिक परीस्थिती निर्माण करणे म्हणजे खरे परीवर्तण होय म्हणून सर्वांना संघटन व टिम वर्क या तत्वावर कार्य करने गरजेचे आहे. प्रसंगी संघटनात्मक कार्य  झाले नाही तरी चालेल संघटन ऐकतेला तडा जानारा विचार हा विघातक आहे कमजोर दुर्बलांना सोबत घेऊन चालन्यारा विचार हा मुलभुत व महापुरुषांची विचारधारा अंमलात आणनारा आहे व तोच महत्वाचा आहे.*
*समाजात काही नकारात्मक प्रभावाचे व संकुचित विचारधारेचे लोक असतातच काही लवकर सहकार्य करतात, काही करत नाही काही गद्दार व धोकेबाज असतात असे सामाजिक चित्र असणारच!. आईला तिन मुल असतील तर त्यापैकी एकाने प्रगती केली नाही वा व्यसनी आहे म्हणून आई त्याला टाकून देत नाही. आम्ही समाजातील अशा प्रत्येक व्यक्तीला टाकत गेलो तर आपल्याकडे वैचारिक व सहकार्य करणारे लोकच उरनार नाही.आपल संघटन कमजोर असन्याचे कारन म्हणजे या पद्धतीची नकारात्मक विचारधारा म्हणजे पद,प्रतिष्ठा,अहंकार व गटबाजी या तत्वांना महत्त्व देणे.*
*सामाजिक परिवारातील लहान मोठी गरीब श्रीमंत जाती भेद बाजूला सारुन सर्व घटकांना सोबत घेऊन एक सामाजिक समतेची श्रृंखला निर्माण करने गरजेचे आहे. याकरिता आपण सुद्धा सर्वांना सोबत घेण्यामध्ये समता व भातृभाव या विचारधारेवर चालनारे लोकांच सामाजिक संघटन निर्माण झाले तर आर्थिक व सामाजिक विषमता दुर होण्यास भदत होईल. हा नको तो नको, तो चांगला तो वाइट ,आर्थिक संपन्न, गटा तटाचा या गोष्टी सामाजिक विषमतेला खतपाणी घालणा-या आहेत अशा संकुचित वृत्तीमुळे समाजात व संघटनेत प्रत्येक क्षणी विघटीत होत असते. असे सामाजिक चित्र हे वर्ण व्यवस्थे प्रमाणे तयार होत जाते असे विषमतावादी विचार बाजूला सारून समता व बंधुभाव या तत्त्वांना अंगीकारल तर सामाजिक व संघटनात्मक एकता निर्माण होण्यास मदत होईल काम करत रहा कुठल्याही व्यक्ति कडून अपेक्षा न ठेवता, समाजातील प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा आहे तो जरी नालायक असला तरी त्याला लाभ झाला पाहिजे हीच संविधानक नैतिकता महत्वाची आहे....!!!*

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?