आंदोलन ध्येय उद्देश्य
सामाजिक आंदोलन ध्येय उद्देश्य सार्थ करु या!
*खालील मत व्यक्त केल आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेऊ नका ते तुमच्या बुद्धीच्या व तर्काच्या कसोटीवर तपासा!*
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
*६ डिसेंबर ला विश्वरत्न माहामानव डॉ.बाबसाहेबांना अभीवादन प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करुन, WhatsApp & Facebook वर लेख लिहुन अभीवादन करतील तर काही प्रत्यक्ष जमीनीवर ग्रामीण भाग, वस्ती, झोपडपट्टी भागात कार्य करुन खरे अभीवादन करतील* *महापुरुषांना प्रामाणिक अभिवादन म्हणजे आजच्या दिवसाला सम्यक संकल्प करुन घेतलेले कार्य पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करने होय. कृतीयुक्त व समाजाला परीणाम देना-या कार्याची दुस-या कडून कसलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष पणे वैयक्तिक रित्या स्वतः जबाबदारी घेणे होय. ६ डिसेंबर महापरीणीर्वाण दिवस, १ जानेवारी भिमाकोरेगाव शैर्य दिवस,३ जानेवारी सावीत्रीआई जयंती, १९ व २३ फेब्रृवारी छत्रपति शिवराय व गाडगे बाब जयंती, १० मार्च सावीत्रीआई स्मृति दिवस... हे निरंतर वर्षभर फिरनारे सामाजिक परीवर्तणाचे चक्र, महापुरुषांचे स्मृति दिवस व जयंती निमीत्य निरंतर गतीमान करत चलणे व परिणाम, निकाल तपासणे गरजेचे आहे त्याचे कारण म्हणजे कार्यकारणभाव व त्याचा परीणाम म्हणजे निकाल होय.* *परीणाम देनारा कृतीयुक्त कार्यक्रम म्हणजे काय???* *आंदोलनला व्यक्ति ने लाखो रुपये देणे म्हणजे परीणाम Result मिळणे नव्हे; केवळ चळवळीला पैसा देऊन चालनार नाही तर स्वतः ज्या ठिकाणी असु त्या ठिकाणी स्वयं कृती करुन स्वतःचा वेळ, बुद्धीमत्ता समाजाला प्रदान करणे होय.* *प्रात्याक्षीक कार्य करना-यांना प्रोत्साहन देणे न की कार्य करणा-या व्यक्तीच्या चुका शोधणे या तुलणेत स्वतःला तपासणे.* *प्रत्येकाणे स्वतः केलेल्या कार्याचा परिणाम Result मोजायची मोजमाप मोजपट्टी तयार करणे.* *प्रबोधनातुन ज्ञानार्जन झाल्यावर जमीनीव प्रत्यक्ष समाजातील गरजुवंत घटकां करीता कार्य करणे व केलेल्या कार्याचा परिणाम तपासणे होय? आम्ही हजारो लाखो ₹ खर्चुन केवळ कार्यक्रम करीत असु प्रत्यक्ष जमिनीवर, समाजात जाऊन कार्य करीत नसु तर आम्हाला गुणवत्ता मिळणार नाही या करीता दुस-या कडुन अपेक्षा न करता प्रत्यक्ष स्वतः राबणे, कार्यास ज्या ठिकाणी असु तिथे स्वतः ला वाहुण घेणे जर वरील बाब याचे प्रतीकुल होत असेल तर आम्ही समाजाचा वेळ व पैसा वाया घालवतो आहोत का? हे ही तपासणे आवश्यक आहे.* *समाजातील ज्या लोकांना वाटतं की, आपण समाजा करीता काहीतरी केल पाहीजे! पर्याय आहे "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका" व "विहार तिथे अभ्यासिका" अथवा स्वतंत्र रित्या परंतु परिणाम कारक (Result Oriented) कार्य करुन समाजाप्रती आपले उत्तरदाईत्वाची जबाबदारी स्विकारने होय.* *आजच्या दिवसाचा सम्यक संकल्प* "अभ्यासिका" व "विहार तिथे अभ्यासिका" या कार्यक्रमा च्या माध्यमातून परीणाम कारक कार्य करन्याचा प्रयत्न, समाजातील जे युवक, युवती झोपडपट्टीत व ग्रामीण भागात राहातात त्यांना अभ्यासा करीता अभ्यासिका निर्माण करुन अभ्यास संस्कृति निर्माण करने. तरुन युवक युवती हा समाजाचा राष्ट्राचा पाया, आधारस्तंभ आहे या माध्यमातून समाजात अभ्यास संस्कृति निर्माण करुया तरुनांचे जीवनी बदवने यावर कार्य करने महत्वाचे आहे. जे जे निस्वार्थ पणे डॉ.बाबासाहेब यांच्या रथाला गतीमान करण्याची मनीषा उराशी बाळगुन असतील अशा सर्वांनी आजच्या दिवशी धिरगंभीर होऊन संकल्प करावा आपल्या संकल्पाला पुर्णत्वास नेन्याचा प्रमाणीक प्रयत्न आपन सर्व मिळ करु या! *क्रांतिसूर्यास विनम्र अभिवादन* *Website:-* ⬇⬇⬇⬇⬇ http://www.abhyasikaa.com
🔥🔥🔥🔥🔥
*BURNING DESIRE OF AMBEDKARITE THOUGHT...*
🔥🔥🔥🔥🔥
*नि:शुल्क अभ्यास संस्कृती चळवळ*
*सौजन्य*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले *अभ्यासीका*
Comments