EARNING AND LEARNING
रोजगार बंद, स्वयंरोजगार बंद, कामकाज मजूरी बंद सर्वकाही बंद असताना गरीब व गरजू विद्यार्थ्यी यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न व गरजुवंतांना जगवण्याचा प्रयत्न म्हणजे समाजात ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत अशा लोकांना हा प्रश्न प्राथमीक प्राधान्यक्रम देणारा वाटला. या समस्येच्या गर्तेत केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातील हातांवर कमावून खानारा वर्गही होरपळा गेला मदत करुन करुन किती करावी, मदत मागुन मागुन किती मागावी यावर समाजातील अत्यंत स्वाभीमाणी लोकांची बात औरच! एका वयोवृद्ध व्यक्तीला मदत दिली असता, त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत असल्याचे वक्तव्य करुन या परिस्थितीत उपलब्ध असलेला रोजगार होईल त्या पद्धतीने करण्याचा आग्रह धरत म्हणाले की, "जोपर्यंत शरीरात बळ आहे तोपर्यंत स्वतः जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे" जर वयोवृध्द व्यक्ती असा स्वाभिमानी विचार ठेवत असेल! हाच दुर्मीळ विचार आचरणात आणत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका शेगाव रहाटगाव अमरावती येथील विद्यार्थीनी शेगाव स्ट्रीट वर दुकान सुरू करुन या माध्यमाने दोन पैसे कमावणे, स्वावलंबनातुन रोजगार व शिक्षण घेणे असा उद्देश म्हणजे आजच्या तरुणाई करीता स्वाभीमान व स्वावलंबनाचे जिवंत उदाहरण होय.*
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका कॉर्डिनेटर अमरावती यांचे पुढाकारातून शिका व स्वावलंबी बना या कोरोना covid-19 वैश्विक महामारी च्या विपदेत विद्यार्थ्यांना मदत, अभ्यासिकेत द्वारा हलाखीच्या काळात समाजातील अत्यंत गरजुवंतांना मदत जी 25 मार्चपासून तर आज पर्यंत हजारो कुटुंबांना मदतीचा हात म्हणजे, एका कुटुंबाला 15 दिवस पुरेल एवढे धान्य व किराणा किट चे वितरण सोबतच राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 अमरावती येथून पायपीट करत चालणाऱ्या व वाहनांमधून कोंबुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाणी बॉटल, बिस्किटे,गुलकोज, दुपट्टे,चप्पल आणि खाण्याच्या वस्तू अशा प्रकारची मदतीचा प्रयत्न अभ्यासिकेच्या माध्यमातुन राबवण्यात आला. मदतीचा हा छोटासा प्रयत्नाचा उदेश समस्या सोडवणे हा नसून समाजातील अधीकाधीक वर्ग सामाजिक ऋण परत करणे करीता तयार करणे होय तसेच अन्य लोकांना अशा कार्याकरिता प्रेरणा व प्रोत्साहनाची निर्मीती करणे होय या दृष्टीकोनाचा परिणाम म्हणजे समाजातील अनेकांनी दान देऊन व समाजात मदत केल्याचे अनेक जिवंत उदाहरणे अनुभवायास मिळणे म्हणजे मोजक्या लोकांची बहुसंख्या लोकांप्रती संवेदना जागृती म्हणजे महापुरुषांच्या कार्याला सकारात्मक पुढे घेऊन जाण्याचा सम्यक संकल्प होय.*
*स्वावलंबना करीता तरुणांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका कॉर्डिनेटर यांचे पुढाकारातून विषम परीस्थितीत मात म्हणून रोजगार व शिक्षण या प्रश्नाला सोडवणे करिता स्वावलंबनातुन रोजगाराची संधी उपलब्धतेचा प्रयत्न अभ्यासिका कॉर्डिनेटर यांनी केली ज्याचा परिणाम म्हणजे अभ्यासिकेत MPSC परीक्षेत Interview दिलेले विद्यार्थी,विविध स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी व परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत स्वावलंबनातु स्वाभीमान व शिक्षण कमवा व शिका या दृष्टिकोनातून शेगाव नाका स्ट्रीट वर दुकान सुरू करुन व्यवहारीक अनुभवाचा कित्ता गिरवला आहे. समाजातील नोकरी पासुन लांब असलेल्या लोकांनी स्वावलंबी बनुन रोजगाराच्या संधीची उपलब्धता कशी निर्माण करता येते हे याचे जिवंत उदाहरण होय. सदर बाबीचा उद्देश म्हणजे परीस्थिती वर मात करत स्वतःचे पायावर उभे करून आत्मसन्मानाने जगणे हा असून बिकट परिस्थिती वर मात करणे करीता व्यवहारीक अनुभवाचे प्रात्याक्षीक होय.*
Comments