अभ्यास किती करावा
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेतील विद्यार्थी विद्यार्थीनी किमान १० (दहा) तास अभ्यास केलाच पाहीजे...
*☸ ☸*
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेच्या यशाचा पाया हा शिस्तपालन आहे आणि विद्यार्थांनी किमान १० तास अभ्यास करणे शिस्तपालनाच्या अन्य नियमांपैकी एक आहे*
*उद्देश्याची कारणे व परीणाम*
*१)शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आम्हाला नैतीक स्वाभीमानी वाघ निर्माण करायचे आहेत ही गेष्ट अध्ययनाने साध्य होणारी आहे*
*२)आमच्या विद्यार्थीचं जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे, स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवली पाहीजे,तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार झाले पाहीजे आणि ही गेष्ट अभ्यासाने साध्य होणारी आहे*
*३)प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवत असते विद्यार्थी हा समाजाचा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे म्हणुन तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हावे पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नये तुम्ही "अत्त दिप भव" व्हावेत या करीता किमान १० (दहा) तास अभ्यास केलाच पाहीजे.*
*४)प्रतीभा ही नाममात्र असते यशोशीखर गाठाणे करीता १००% मेहनत कठोर परीश्रमा शिवाय कुठलाही (Shortcut)नाही म्हणुन अभ्यासा बाबत अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव कठोर परीश्रमा,मेहनत व परिणाम आपल्या जीवनातील सत्य आहे.*
*५)तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावा लागतो. आत्मोन्नतिचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे,विद्यार्थीनी त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे.*
*६)अभ्यासीकेतील प्रत्येक विद्यार्थात महत्वाकांक्षा असलीच पाहिजे.महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही.म्हणुन विद्यार्थी मध्ये महत्वाकांक्षेचे बीज प्रथम रुजलेच पाहिजे.आळस हा विद्यार्थीचा शत्रु आहे तरुणांचे वर्तण "खायला काळ व भुईला भार "असे असेल तर -हास निश्चित आहे.अनेक तरुण असे आहेत की, जे २५ मिनिटे अभ्यासाला सतत बसू शकत नाहीत त्यांना सतत बसुन अभ्यासच करता येत नाही.हे अयोग्य आहे २४ तासापैकी किभान १० तास अभ्यास केलाच पाहिजे.विद्यार्थीनी आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवन्या करीता परीश्रम घेतले पाहिजेत.*
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेतील प्रत्येक विद्यार्थाने सुविद्द्य व्हावे, कारण शिक्षण हि तलवार आहे . शिक्षण हे शस्त्र आहे, विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते.शिक्षण घेतलेल्या माणसांच्या अंगी शील व सौजन्य असल्यास तो समाजास दिशा निर्देश देऊ शकतो.आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ करता यावा त्यांची सेवा करता यावी निदान स्वतः जबाबदार नागरीक घडावा म्हणुन तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून परीणाम देणारे कार्य हे कठोर मेहनत अभ्यास करुन स्वतः ला सिद्ध करुन समाजात आत्मविश्वासाचे चित्र फक्त तरुणच निर्माण करु शकतात या करीता विचारधारेच्या सचोटीला शिस्तपालन हे अत्यावशक आहे.*
✅✅✅✅✅
☸☸☸☸☸
*RJPA*
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका.*
⬇⬇⬇⬇⬇
http://www.abhyasikaa.com
•••••••••••••••••••••••••
*Facebook Page:- *
⬇⬇⬇⬇⬇
https://m.facebook.com/राष्ट्रपीता-ज्योतीबा-फुले-अभ्यासीका-1036873186326438/
°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*Facebook Group:- *
°°°°°°°°°°°°°°°°°°°
https://m.facebook.com/groups/137666599721640?refid=27&ref=dbl
⬇⬇⬇⬇⬇
*youtube*
https://m.youtube.com/watch?v=ektHJQI320c
⬆⬆⬆⬆⬆
☸☸☸☸☸
*Rastrapita Jyotiba Phule Abhasika...*
*"A MOVEMENT FOR BULDING THE SOCIETY"*
☸☸☸☸
*Share the Mission*
*विनीत*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
*अभ्यासिका*
Comments