निरपेक्ष मदत व परीणाम
निरपेक्ष मदत व परीणाम
‼️🎼🎼🎼‼️
समाजात काही लोक स्वत:हुन निरपेक्ष पणे मदती करीता पुढाकार घेत असतात कारण अशा लोकांना मदतीच्या कर्माच्या महत्त्वाची जाणीव झालेली असते. वैयक्तिक, संघटनात्मक वा महासंघाचे माध्यमातून काही लोक बहुसंख्य लोकांना निरपेक्ष मदतीच्या कर्माने हात देत असतात आणि हिच सामाजिक मदतीच्या कर्माची श्रृंखला कृतीगत व वृद्धिंगत करणे गरजेचे असते. समाजातील विविध घटकांनी आपल्याला मदत केली, ज्याचा परिणामाची फळे आज चाखतो आहे अनुभवतो आहे. मदतीच्या कर्माच्या कृतींची जाणीव ठेवून मी सुद्धा गजुवंताला आवश्यक वेळी निरपेक्ष मदतीचा हात दिला पाहिजे अशी कृती घडणे गरजेचे म्हणजेच समाजाने दिलेले ॠण समाजाला परत करणे होय.
मदतीचे स्वरुप हे वेळ,बुद्धी, पैसा,परीश्रम,आत्मवीश्वास, मार्गदर्शन अशा विविध स्वरुपात असते जे विधायक कर्म होय. कर्म म्हणजे क्रिया जी गतीमान असते जे हेतुपूर्वक,जाणीवपूर्वक केलेल कर्म आपली अवस्था ठरवतं असते प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते हे सत्य तथागत बुद्धांनी सांगितले तेच न्युटन ने मांडले "Every action must have an equal opposite reaction" म्हणजे "जसे कराल तसे भोगाल आणंदीत व्यक्ती आणंद देईल,निंदक निंदा देईल, सकारात्मक आत्मविश्वास देईल तर नकारात्मक दुराचार देईल पेराल तसं उगवेल.
विधायक कुशल कर्म आसक्ती,राग,लोभ,मोहातून होत नसते तर ती करुणा आणि प्रज्ञेतुन घडत असते. क्रिया आणि प्रतिक्रियेचे ज्ञान वाईट कार्यापासून दुर व चांगल्या कार्याची प्रेरणा देत असते आणि हिच कृती व्यक्तीला दु:खी,कष्टी वा सुखी आनंदी करु शकते अर्थात विकारयुक्त किंवा प्रसन्नयुक्त मनावरच चांगले किंवा वाईट अवलंबून असते म्हणजेच जो ज्याच्या सवयीने कार्य करतो त्यचाच तो परीणाम असतो.
व्यक्ती द्वारे दुस-याला निरपेक्ष मदतीचा हात देणे म्हणजे कुशल कर्म, जे स्वत:ला व दुसऱ्याला सुख आणंद मिळवून देत असते; मला कुणीतरी मदत केली होती आणि मी सुद्धा इतरांना मदत करेल हे ध्येय संकल्पीत केले तर व्यक्तीची माणसीक अवस्था आनंदी, सकारात्मक आणि सामाजिक ऋण व सामाजिक भातृभाव वृद्धिंगत करण्याला मदतीची ठरेल.
🙏🙏🙏
Comments