गटबाजी हीच हिन व निच मानसिकता
गटबाजी हीच हिन व निच मानसिकता..!!!
•••••••••••••••••••••••
संगठन असाव कुटुंबा सारखे, ग्रुप,ग्रृप करुन गटबाजी नसावी,मतलबी व स्वार्थी पनाची कृती नसावी...
कृती असावी प्रेमळ आणि जिवाभावाची.....
बा भिमा तुझ्या पाखरांना
पंख किती ते फुटले...
घरटे तुझे ते सोडुन
दुसर्या फांदीवर जाऊन बसले...
•••••••••••••••••••••••
वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. तुंम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामिल होने म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहित आहे कि आपण कळपाने राहिले पाहिजे.
आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्ख पणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा.
डॉ. बी. आर. आंबेडकर.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे,
खंड-18 भाग-03 पान नं.138)
आपल्या वैयक्तिक जीवनाचा विकास व्हावा पन तो एकमेकांच्या गच्चीवर पाय ठेऊन नव्हे माझीच प्रगती व्हावी मी लायक अन्य नालायक समाजिक जीवनात सर्वांच्या कल्यानाची भावना ठेवनारे नव्हे त्यांच्या प्रगती करीता मदत करनारे सामाजिक दृष्ट्या लायक होत..बाकी सर्व गटबाजी करनारे नालायक होत...असे नालायक स्वतःच अस्तित्व निर्माण करने करीता कुठल्याही स्तराला पोहोचतात आपसात भांडन लावने दुस-याच्या चुगल्या, तो वाईट हा वाईट हा खराब अशी निंदा करीत फिरतात.मग समाजाचे संघटनेचे नुकसान झाल्यास हरकत नसते कारन ग्रृप,गटा तटा करीता करत असलेलं काम हेच सामाजिक व देशभक्तीचे कार्य वाटायला लागते...
श्रेष्ठ कार्य तेच जे आपल्या शत्रुलाही दु:खाच्या समयी मदत करता येइल! जो पर्यंत समाजातील आर्थिक दृष्ट्या संपन्न व्यक्ति वा त्यांचा समुदाय समाजातील पढीत दबलेल्या गरजु लोकांकरीता कार्य करीत नाही तोपर्यंत बदल होनार नाही. कूपमंडूक संकुचित मनोवृत्ती ठेवनारे फुटीरवादी व गटबाज वृत्ति असना-यांनी आपल्या सामाजिक ध्येय व उद्देश्यात यशस्वीता होने करीता माहापुरूषांची विचारधारा जी सर्वव्यापक आहे तीचा अंगीकार करने गरजेचे आहे.
सामाजिक संगटन चा उद्देश्यच एकमेकांची सुख दुःखात मदत करने असा आहे,संकटात मदतीचा हात देने,विचाराची देवाण घेवाण करने जेथे वैचारिक गुलामगीरी आहे तेथे विचारधारा व व्यापकतेचे काय देणे घेणे? जेंव्हा एखादा व्यक्ति वा त्याचा ग्रृप,समुह सामाजिक हिताच्या विरोधात कार्य करत असने म्हणजे सामाजिक गुन्हा करत असने होय तेंव्हाच त्यातील वरीष्ट व उच्चशिक्षीत स्वतःला सामाजिक म्हनवनारे यांची नितीमत्ता शेण वा घाण खायला गेली असते का?
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख,अन्नाभाऊ साठे यांच्यात कमालीचा परोपकार होता आम्ही त्यांचे वंशज,आमच्या महापुरुषांचा महान वैचारिक वारसा आम्ही विसरलो...गटबाजांची गटबाजी वृत्ति ही थुंकीलाही लाज वाटावी अशी मी पनाची व स्वार्थी पनाची समाज व संघटन विरोधी कृती जी लाजेलाही लाजवनारी वाईट कृती ही सामाजिक आरोग्याला किती घातक अशी वृत्ति प्रगतिशील कृती ला मागे खेचनारी नव्हे काय?
आर्थिक दृष्ट्यासंपन्न व भांडवलदारी वृत्ति असना-या व्यक्तिच्या मनात सामाजिक परोपकाराची, त्याग,समर्पिनाची भावना का निर्माण होत नाही? या सर्वांचे समाजाच्या,संघटन च्या विरोधातील कृत्ये ही निंदनीय अपराध,असे सामाजिक अत्याचार यशस्वीपणे सतत चालूच असतात कारन स्व अस्तित्व! आम्ही व आमचा गट सर्वशक्तिमान आम्ही काहीही करु शकतो, जर पैशाने संपत्ति ने शक्तिमान होने असा समज असेल तर अन्य गरीब व गरजु लोक ज्यांना वरील मानसिकतेची लोक हलकट समजतात...म्हनुन गरीबांनी आपला स्वाभीमान जपावा अशा निच व हलकट वृत्ति ने मानवतेवर पडलेल्या संकटांपासून सावरने करीता स्वतः सक्षम व्हावे ऐकसंघ व्हावे व अशा निच विचारधारेवर मात करावी.
Comments