गरजुवंतांच्या मदतीला प्राधान्य...!

महापुरुषांची विचारधारा व संस्कारराने; स्वतःची समस्या मागे ठेवत अन्य गरजुवंतांच्या मदतीला प्राधान्य...!
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
   कोरोना वैश्विक आपदा लक्षात घेता वस्ती,स्लम,झोपडपट्टी आणि गावात समाजला मदत व्हावी या करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका(RJPA) व विहीर तिथे अभ्यासिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रात टिम कार्यरत आहे. मदती दरम्यान आलेल्या जिवंत अनुभव आपल्या सोबत शेअर करणे गरजेचे वाटते.
    आपल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावांत झोपडपट्टी,वस्तीला प्रबुद्ध नगर,आंबेडकर नगर, रमाई नगर,सिद्धार्थ नगर,राहुल नगर,कबीर नगर, मा.फुले वार्ड, यशोधरा नगर असे महापचरुषांच्या नावावर नामकरण जे प्रत्येक गावात शहरात वस्त्या वसलेल्या आहेत जसे महापुरुषांच्या नावावर वसत्या आहेत तसेच संस्कार व विचारधारा सुद्धा अनुभवास मिळाली.या ठिकाणी पूर्वी राहणारे लोक आज शिकले सुशिक्षित झाले व नोकरीला लागले व आर्थिक सुबत्तता येताच वसाहती,काँलनीत वास्तव्याला गेलेत. गाडी,घर,बंगला आणंदीत संसार आरामदायक चैनीचे जिवन आहे; परंतु त्याच आपल्या वस्तीत,नगरात बहुतांश लोक आज कोरोना समस्ये मुळे प्राथमिक गरजां करीता संघर्ष करत आहेत. कदाचित आज गरजुवंत आपल्याला मदत मागायला संकोच करतील परंतु आज जे जे या समाजाच्या भरवशावर मोठे झाले त्या सर्वांची जबाबदारी आहे की आज ह्या वस्त्यांकडे आवर्जून लक्ष देऊन अत्यंत गरजूवंताना परीपूर्ण मदत नाही तर; निदान फुल ना फुलांची पाकळी मदत व्हवी या करीता समाजातील कर्मचारी, व्यापारी, व्यवसायी या सर्वांनी आपल्या वैयक्तिक स्तरावर अथवा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकज(RJPA)च्या कार्यात हातभार लावावा व समाजाला मदत करावी.
    सामाजिक मदतीच्या अनुशंगाने मदतीचा हात मिळणे करीता सोशल मिडिया च्या माध्यमातून जेव्हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका(RJPA) कोअँर्डीनेटर ला "दादा एका घरी कंडीशनर खराब आहे काही मदत होईल का?" असा गरजुवंतांचा संदेश प्राप्त होताच (RJPA)टिम ने विनाविलंब कोअँर्डीनेटर आकाश व अश्वजीत यांनी अत्यंत गरजुवंत दहा परीवाराची शहानिशा केली असता असे लक्षात आले की, मागणी करणारी व्यक्ति अन्य दहा लोकांपेक्षा जास्त गरजुवंत असतांना आधी स्वतःला प्राधान्य न देता समाजातील अन्य दहा परीवारास प्राधान्य दिले ज्यात एक मुस्लिम परिवार व एक अन्य परिवार सुद्धा सहभागी होता ज्यांना तत्काल मदत सुद्धा प्राप्त झाली.*
    *वरील उदाहरण हे समाजिक उदारभावाचे आहे समाजात मदत करणारे काही लोक विभीन्न उद्देश्य ठेवून कार्य करत असतात, परंतु काही मदत करणारे असे असतात की, जो समाज संसाधन रहीत असतांना आपल्या सोबत अन्य लोक सुद्धा समस्या ग्रस्त आहेत याची जाणीव, स्वतःच्या आधी दुसऱ्याला मदत व्हावी! असा दृष्टिकोण, असे संस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने समाजात निर्माण केली आहे वरील जिवंत उदाहरण म्हणजे समाजिक भातृभाव होय जे डाँ.बाबासाहेबांना अपेक्षित होते; अशी विचारधारा महापुरुषांनी आपल्या दिली आहे तात्पर्य अशी भावना जपणारे व अशा विचारधारेची लोक समाजात निर्माण होणे करीता जागृत अनुयायी जे आधी गावां,झोपडपट्टी,वस्तीत होते जे आज काँलनी,वसाहतीत राहत आहेत यांनी आशा वेळप्रसंगी समाजाला मदत करावी व मोठ्या प्रमाणात महापुरुषाची विचारधारा समाजात निर्माण होणे करीता समाजिक जागृती अभीयान राबवावे करीता हा प्रपंच.!
🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?