कष्टकरी कार्यकर्त्यावरही चर्चा व्हावी!

मेहनती व कष्टकरी कार्यकर्त्यावरही चर्चा व्हावी!
•••••••••••••••••••••••••••

कार्यक्रमा च्या पूर्वतयारी करीता व कार्यक्रमा नंतर विलेवाट करीता सतत ढोरकष्ट लेबर वर्क करणा-यांचे हार्दिक अभीनंदन तुमची चर्चा करण्या ऐवजी आम्ही पद प्रतीष्ठेत अहंकार यात अडकलो आहोत, लेबर वर्क करणारे घरचे लखपती असुनही आंदोलनाची जबाबदारी म्हणुन नियोजित कार्य पार पाडनारे लोक होत ही मंडळ अधीकारी व कार्यकर्ते मागील विस वर्षा पासुन चळवळीला मोठ करण्या करीता अहोरात्र पद, पैसा, प्रतिष्ठा, अहंकार, मान सन्मान, पद, वर्दी घरच्या गोदरेज कपाटात कुलुप बंद करुन चाबी घरी ठेवुन, ऐक सामान्य कार्यकर्ता म्हणुन सामाजिक कार्य करण्या करीता बाहेर पडत असतात; कदाचीत हा त्यांचा मूर्खपणा असावा! आणि हा मूर्खपणा मागील दहा वर्षापासून काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत म्हणुन चळवळ व आंदोलन मोठ होत आहे.
सर्व जर असा दृष्टिकोण ठेवल्यावरच चळवळ यशस्वी होईल अन्यथा, विवेक पूर्ण व अवीवेकी लोक यात काहीच फरक असणार नाही. राबलेल्या व्यक्तिचे त्याग व समर्पन त्या व्यक्ति च्या जागेवरुण अनुभवने महत्वाचे असते व्यक्ति व कार्यकर्ते समाज कार्य व सेवा देत असतील तर ते फक्त ऐका गोष्ठी ची अपेक्षा ठेवतात...

‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

चळवळीला कार्यकत्याला स्थान नसेल तर वाताणुकुलीत नियोजन करणा-या अधिका-यांना महत्व प्राप्त होनार नाही. अधीकारी हे कार्यकर्त्या मुळे जिवंत आहेत त्यांना प्रेत्साहन देऊण त्यांच्या कार्यावर चर्चा होणे ऐवजी पद प्रतीष्ठे वर चर्चा होत असेल तर कष्टकरी कार्यकर्ते भविष्यात निर्माणच होणार नाही म्हणुन आंदोलनात या गोष्ठीनचा समन्वय साधला गेला तरच चळवळीत व आंदोलनात अधीक परिणामकारक निकाल मिळतील.

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?