रमाई_चे_अर्थशास्त्र

 
   रमाईचे व्यक्तीमत्व रेखाटताना साहितीकांनी आपल्या समवेत दिन दुबळी,गरीब, दारिद्र्यात असलेली रमाई रेखाटली या पलीकडची रमाई समाजाने शोधणे गरजेचे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संसार सांभाळताना रमाईला करावी लागणारी धळपळ म्हणजे आर्थिक जुळवाजूळव.
    आर्थिक दृष्टीकोनातून रमाई बद्दल केलेला विचार हा वेगळ्या पद्धतीने केलेला विचार होय त्यांनी सर्वाहून वेगळ्या पद्धतीने रमाईचा आर्थिक दृष्टीकोन मांडणे म्हणजे महापुरषांचे उदार पैलूंचे सकारात्मक प्रक्षेपण करणे होय. गोव-यातून आर्थिक उत्पन्नाचा विचार शंभर वर्षांपूर्वी रमाईने केला मात्र आज गोवऱ्या चे रुपांतर आज शेनाचे गट्टू जे औद्योगिक व्यवसायीकरण झाले आहे ज्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जात आहे. आज गोव-या जाळण्या करीता औद्योगीक कारखाने व भट्टी,शव गृह ईत्यादी ठिकाणी उपयोग केला जात आहे अर्थातच आज व्यवसायाचे रुपांतर कारखाण्यात झाले आहे शंभर वर्षांपूर्वी रमाई ने हा व्यवसाय केला आज अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून रमाई मांडणे व अनुकरण करणे ही आजची वास्तवीकता झाली आहे.*
    *साहित्यीक,लेखक, कवी यांनी केवळ एका दिशनेच रमाईचे व्यक्तीमत्व रेखाटले ते म्हणजे दिन दुबळी,गरीब, दारिद्र्यात असलेली रमाई साहित्यीक आणि समाजातील लोक आणखी किती दिवस दुबळी रमा प्रक्षेपित करणार आहेत? आज यावर वैचारीक चिंतन होणे गरजेचे झाले आहे.* *दुःख,गरीबी,बिमारी या पलीकडेही रमाईने आर्थिक जबाबदारी उचलून आपल्या कुटुंबाला मदत केली, आपला संसार उभा करण्या करीता व्यवसायाची कास धरली या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. रमाईने आपल्या क्षमतेनुसार व्यवसाय केल आणि त्यातून नफा मिळवला या आर्थिक व्यवहारातून बहुजन समाजातील लोकांनी समाजातील सर्वानीच उद्योगाची प्रेरणा घेणे आज गरजेचे आहे म्हणून रमाईचे अर्थशास्त्र बहुजन समाजा पर्याय पोहोचणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
रमाई जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?