आरोप_प्रत्यारोप....शाक्य गणराज्याचा आदर्श म्हणजे पारदर्शकता आणि सर्वांचा सहभाग
🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨
समाजिक कृती कार्य करताना काही वेळा समाज काही व्यक्ती विषयी मतभेद निर्माण होतात, आरोप केले जातात,वाद निर्माण केले जातात. ही प्रक्रिया स्वाभाविक आहे ज्यांच्या त्यांच्या अस्तित्वाशी जुडलेला विषय असतो. मात्र मतभेद वैचारिक असावेत, वैयक्तिक नव्हे.
कृतीशील कार्य करणारी व्यक्ती महापुरुषांचे विचारधारेचे परीणाम कारक कार्य करत असेल. त्यांनी वेळ, श्रम, बुद्धी आणि चळवळीला हृदयपूर्ण समर्पण दिले असेल. त्यांच्या कार्याने काहींना दिशा, प्रेरणा,आणि संधीही निर्माण झाली असेल.अशा कार्यकर्त्या व्यक्तीविरुद्ध अंध आरोप व प्रत्यारोप हे न केवळ अयोग्य आहे, तर ते समाजातील चळवळीची ऊर्जा नकारात्मक दिशेला वळवनारे आहे.
ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांना देखील त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.शाक्य गणराज्यात जेव्हा सिद्धार्थ गौतमांवर आरोप झाले, तेव्हा त्यांना राजसभेत बोलावून, सगळ्या जनतेसमोर त्यांचा पक्ष मांडण्याची संधी दिली गेली. आपण नेमके या उलट करतो स्वतःआरोप करतो, स्वतः वकीली करतो आणि स्वतःच न्याय निवाडा करतो. ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांना समोर बोलावून चर्चा करुन त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ही लोकशाहीची खरी परंपरा सर्वांसाठी समान आणि न्यायसंगत वागणूक आहे.
चळवळीत कार्य करतांना कार्यकर्त्या वर एकतर्फी आरोप लावले जातात, जे नैतिकदृष्ट्या चुकीचे तर आहेतच, पण संघटनात्मक दृष्टिकोनातूनही घातक ठरतात.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आरोपांत नाही, तर संवादात असते. प्रश्न विचारणं गैर नाही, पण निर्णय घ्यायचा असेल तर तो नैसर्गिक न्यायाच्या चौकटीत आणि पारदर्शकतेनेच घ्यावा लागतो. एकतेतच शक्ती आहे आणि शक्तीच बदल घडवते शुद्ध आचरणाच्या आणि मोकळ्या संवादाच्या मूल्यांवर चळवळ उभी असते.
Comments