क्रांती प्रतीक्रांती

"अंधारातील काळी मांजर"
(The Black Cat in the Dark) 
   समाजातील सामाजिक,आर्थिक शोषण, जातिव्यवस्था,गरीबी, अन्याय, अत्याचार,अंधश्रद्धा, यावर हल्ला न करता, केवळ राजकीय बदल हा "अंधारात काळी मांजर शोधण्यासारखा" प्रयत्न आहे.

    अंधार खोलीत काळी मांजर असेल तर ती दिसणार नाही परंतु सत्य हे की खोलीत मांजराचे अस्तित्व असूनही मांजरीचे दिसणे शक्य नाही सत्य हे की,मांजरही आहे आणि काळोखही आहे.

    अंधार खोलीत काळी मांजर नाही आणि सांगीतल्या गेले की खोलीत काळी मांजर आहे. मांजरीचे अस्तित्व नसूनही काळी मांजर असल्याचा भासल्याचे भासते. सत्य हे की, काळोख आहे पण काळी मांजर नाही. वास्तव हे की अयोग्य पद्धतीने चुकीच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे अंधारात काळी मांजर शोधणे होय.

समस्येचे मूळ शोधणे आवश्यक आहे जसे अंधारात काळी मांजर शोधण्या ऐवजी प्रकाश करावा लागेल, तसेच काळी मांजर असल्याचे वा नसल्याचे सिद्ध होईल. प्रकाश केला तर मांजर शोधणे शक्य आहे. समस्येच्या मुळाचा शोध महत्वाचा आहे.

  समाजातील सामाजिक,आर्थिक असमानता, जातिव्यवस्था,गरीबी, अन्याय, अत्याचार, बेरोजगारी इ. समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रथम त्यांचे मूळ कारण ओळखणे गरजेचे आहे. खऱ्या क्रांतीसाठी समाजरचनेत मूलभूत बदल आवश्यक आहेत. फक्त बाह्य बदल पुरेसे नाहीत. जातिव्यवस्था, धर्म, आर्थिक असमानता यांसारख्या मूलभूत समस्यांवर हल्ला न करता, केवळ उपरी उपाययोजना करणे हे "अंधारात काळी मांजर शोधण्यासारखे" आहे.

   खऱ्या क्रांतीसाठी मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले, तर प्रतिक्रांती (counter-revolution) होते. म्हणजे जुनी व्यवस्था अप्रत्यक्षपणे टिकून राहते. फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याने भारतातील सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही 

    समस्येचे मूळ ओळखून मूलभूत बदलांसाठी कार्य करणे आवश्यक आहे. अर्ध-उपाय आणि चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न म्हणजे दांभिकता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही भारतासह जागतिक समस्येवर तोडगा आहे.


Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?