त्याग समर्पण व बलिदान हेच नेतृत्व निर्माण करतात.
त्याग समर्पण व बलिदान हेच नेतृत्व निर्माण करतात.
सामाजिक कार्याचे नेतृत्व करत असतांनी कार्यकर्ता,अनुयायी व संघटनेत सुक्ष मतभेद निर्माण होत असतात ते वेळेत दुर सारल्या गेले नाही तर मतभेदाचे पर्यावसान मनभेदात होत ज्यामुळे आपसात गट तट व दरी निर्माण होऊन आंदोलनाची अपरीमीत हाणी होत असते. मतभेद,मनभेद व गैरसमज दूर सारणे करीता सामाजिक उत्थाना; चळवळ व आंदोलना करीता सकारात्मक संवाद साधने गरजेचे असते प्रसंगी दोन पवल मागे येणे गरजेचे असते दोन पावले मागे येणे म्हणजे अपमान होने,लहानपण घेणे असा होत नसुन ते वैचारीक प्रगल्भतेचे सकारात्मक लक्षण असते.ज्याचा फायदा व्यक्तीला नव्हे तर आंदोलनाला होत असतो.
"विहार तिथे अभ्यासिका" आंदोलनाचे अनुशंगाने वस्ती, गाव,शहरातील विहारात काही वैयक्तिक,राजकीय,समाजीक, नेतृत्व निर्माण करणाऱे संघर्ष या कारणांमुळे समाजात संघर्ष,मतभेद,गैरसमज निर्माण होत असतात आणि अशा समस्या सोडवण्यासाठी व समाजात समन्वय निर्माण होण्यासाठी राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिकेचे कोआर्डीनेटर यांच्यात समन्वयकाची भूमिका पार पाडतांना बहुतांश ठिकाणी सकारात्मक परिणाम लाभले आहेत ज्यामुळे "विहार तिथे अभ्यासिका" या आंदोलनाला समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.
सामाजिक कार्य करतांना कर्तव्याला आम्ही आंदोलन, चळवळ संबोधित असू तर व्यक्ती ने एकटे कार्य न करता टिम वर्क च्या माध्यमातून समाजात जाऊ प्रत्यक्ष जमीनीवर जाऊन कार्य करणे गरजेचे असते. राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिका व विहार तिथे अभ्यासिका या निशुल्क सामाजिक उपक्रमाचे कोअर मेंबर, कोआँर्डीनेटर सांघीक पद्धतीने टिम वर्क ने कार्य करून विगत 2012 पासुन पद,प्रतीष्ठा,प्रसिद्धी या पासुन दूर राहत आजही कोआर्डीनेटर त्यावर अंमल करीत आहेत आणि कुठलाही निर्णय हा सांघिक लोकशाही पद्धतीने घेऊन ध्येय उद्देश निश्चित असल्याने आंदोलन यशस्वीपणे कार्यरत आहे याचा परिणाम म्हणजे RJPA आदोलनाने महाराष्ट्रात 48 ठिकाणी अभ्यासिकेच्या माध्यमातुन समाजाला निस्वर्थ व निशुल्क सेवा प्रदान केली आहे.
समाजात कित्येकदा असे अनुभावास येते की,आर्थिक संपन्न लोक लाखो,हजाराचे रुपये वैयक्तिक दान देऊन चळवळ आंदोलनास ध्येय उद्देशा विरुद्ध वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात या ऐवजी व्यक्तीने व्यक्तिगत जबाबदारी,पुढाकार घेणे ऐवजी सामूहिक जबाबदारी "TEAM WORK" ने कार्य करणे गरजेचे असते. वैयक्तिक कार्य करणाऱ्या एकट्या व्यक्ती ने लाखो हजारो रुपये दिले तरी त्यात समाजीक उत्तरदायित्वाची व सामुहिक कार्याची भावना त्यात निर्माण होत नसते आणि अधिक सकारात्मक परीणाम मिळणे कठीण असते. समाजात वैयक्तिक प्रसिद्धी आणि श्रेय प्राप्ती करीता काही लोक धडपडत असतात परंतू वैयक्तिक कार्य पेक्षा सामूहिक कार्याला अत्याधीक महत्त्व देने जास्त गरजेचे असते ही महत्वपूर्ण बाब जेव्हा लक्षात घेतली जाते आणि अंमलात आणली जाते तेव्हाच खरोखर आंदोलन यशस्वी होण्यात मदत होत असते.
समाजाचे नेतृत्व हे समाजीक कार्यातून जे त्याग,समर्पन व बलीदान या निकषांवर विकसित होत असतात. नेतृत्व करणारे नैतिक व अभ्यासु व्यक्तिमत्व आपली जबाबदारी सांभाळून सम्यक दृष्टि ठेऊन धम्मकार्य, सामाजिक कार्यात पुढाकार घेऊण आचरणशील होऊन कार्यरत असतात "बोले तैसा चाले" या उक्ती प्रमाणे सतत प्रयत्नशील असतात असे लोक सामाजिक कार्यकर्ता,कामगार,अधीकारी, कर्मचारी, व्यवसायी कुठल्याही पदावरील व्यक्ति समाजाला नेतृत्व प्रदान करु शकतात.
डॉ.बाबासाहेबांच्या नंतर चळवळ व आंदोलन उभे करण्याचे प्रामाणिक कार्य RJPA च्या सर्वसामान्य व गरीब कार्यकर्ते व कर्मचारी यांनी या तत्वावधानावर उभे केले आहे. अध्यक्ष सचीव हे फक्त तांत्रिक बाब सोडवणे करीता असावे खरा उद्देश्य पद पैसा प्रतीष्ठा अहंकार बँनर पोस्टर,प्रसिद्धि हे सर्व सोडुन केवळ संघठन चा पाया कसा मजबूत करता येइल कसे प्रचारक, प्रसारक निर्माण होतील कसे अभ्यासक वाढतील, समाजाला Time Treasury & Talent देणे म्हणजे आपल्या उत्पन्नाचा 5% भाग समाजाला प्रदाण करणे जे Payback To Society या तत्वावर संगठन निर्माण करणे होय अशा या कार्यातुन आम्हाला वैयक्तिक काहीच मिळनार नाही आम्हाला समाजाला केवळ द्यायच आहे हे सत्य स्विकारुण समाजात भातृत्वाची भावना निर्माण होणे करीता कुणाचाही द्वेश न करता,राजकारन न करता फक्त समाजकारण करीता शासनाचा कुठलाही फंड न घेता कार्यकत्याचा 20 वा भाग दानाच्या स्वरूपात संगठनेला प्रदाण करणे या तत्वावर आपले सामाजिक कार्य राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिकेने मागील आठ वर्षी पासून कित्येक गरीब गरजूवंत कुटुंबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून हजारो विद्यार्थीना निशुल्क लाभ देऊन RJPA आंदोलना द्वारे केलेल्या कार्याच्या व परीणामाच्या माध्यमातून सिद्ध करुन दाखवले आहे.
चला आजच आपल्या कार्यास परिणाम कारक सुरुवात करण्या करीता "विहार तिथे अभ्यासिका" माध्यमातून आपल्या विहारात अभ्यासिका निर्माण करुन नव पिढी च्या भविष्याचे नियोजन करीता प्रयत्न करुयात ज्यामुळे डॉ.बाबासाहेबांचे कार्य अधीक गतीमान करण्यास मदत होईल.
Comments