मनोग्रह विस्तीर्ण आहे.

मनोग्रह विस्तीर्ण आहे.
‼️🎼🎼🎼‼️
सामाजात ऐकीव गोष्टींवर आंधळे पणाने प्रेम करणारे बहुसंख्य आहेत या विपरीत डोळसपणे व विषयाची कारणमीमांसा करणारे बोटावर मोजता येईल इतके आहे असे बहुसंख्य लोक आपलं वेगळं विश्र्व निर्माण करत असतात हे पिढीजात व रुढी व संस्काराच्या कुबड्या घेऊन मोठेच नव्हे तर म्हतारे होऊन गतप्राण देखील होतं असतात. अशा लोकांना आपल्या जीवनात आभासी,काल्पनिक व मृगजळीय माणसीकतेची सवय जडल्याने त्यांना काल्पनिक व मित्था गोष्टी जास्त समर्पक व चांगल्या वाटत असतात विषय आणि त्याची कारणमीमांसा करणे गरजेचे वाटत नसते वाळवंटातील मृगजळाला पाणी समजणे, पाणी भरलेल्या काचेच्या पेल्यात टाकलेली काळी वाळकी दिसणे परंतु सत्य मात्र वेगळंच असते अशा लोकांचं आभासी जग हेच विश्व असते आणि इतरांनीही याच चाकोरीबद्ध वाटेवर जावं असं त्यांना अपेक्षित असते.
     वर्तमानात अशा वर्तनाची लोक बहुसंख्य अनुभवायास येतात जी समाजाला नकारात्मक वाटेवरुन नेत असतात यांना खरं,खोटं,बर वाईट हे महत्त्वपूर्ण नसते तर विशीष्ट व्यक्ती व समुदाय महत्त्वाचा असतो जनकल्याण हे नाममात्र असते म्हणजेच व्यक्ती व समुदाया परत्वे त्यांची माणके बदलत असतात. एकाच कृत्या करिता एकाला एक व त्याच कृत्या करिता दुसऱ्याला दुसरी अशी असमानतेची वागणूक देत असतात अन्यायालाही हे न्याय समजत असतात आणि या अर्धवट ज्ञान व वर्तनालाच ते सत्य मानत असतात.
     व्यक्ती व समुदाय हा चुकीचा दुराग्रही,अनैतिक असला तरी मैत्री,नाते सांभाळाण्याची,चुका सांभाळण्याची,चुका काढणे टाळणारी,चुकले तरी डोळेझाक करणारे,चुकीला प्रोत्सान देणारे,कृती आवडली नसली तरी लाचारी पत्करणारे अशा नकारात्मक मानसिकतेची लोक काय व्यक्तीपरीवर्तन व समाज परीवर्तन करतील?
जिवनाचे ध्येय निरपेक्ष जीवन जे स्वाभीमान व सत्याला उपकृत करणारे, दुसऱ्यांना मदत करणारे,समाज परीवर्तन करणारे समाजातील असा घटक नेहमी सत्याला वारंवार कसोटीवर तपासत असतात. विषय कार्य व त्यांची कारणमीमांसा करुनच ते सत्याला सत्य व खोट्याला खोट म्हणून स्विकारत असतात व निर्णयात्मक कृती करत असतात. समाजात परीवर्तनाचा मुख्य आधार म्हणजे विषयाची चिकित्सा करणे होय. व्हाल्टेयर ने धर्मचिकित्सा केली,संत कबीराने चिकित्सा केली, छत्रपती शिवरायांनी चिकित्सा केली, राष्ट्रीपिता ज्योतिबा फुलेंनी चिकित्सा केली, छत्रपती शाहु महाराजांनी चिकित्सा केली, प्रबोधनकार ठाकरेनी चिकित्सा केली,श्रीधरपंत टीळक यांनी चिकित्सा केली, दाभोळकर, पानसरे,कुलबर्गी,गौरीलंकेश यांनी चिकित्सा करुन प्राणाची आहुती दिली.
   परीवर्तन करणारे हे चिकित्सक होते त्यांनी प्रस्तापीत व्यवस्थेला प्रश्र्न विचारले, प्रश्र्न मांडले?का?कसे?कशाला? विचारुन विषयाची चिकित्सा केली सत्याला सत्य समजले व समाजाला न्याय दिला आम्ही कधी बोलणार आहोत? कधी प्रश्र्न विचारणार आहोत?सत्याला सत्य व खोट्याला खोटं कधी म्हणनार आहोत?अन्याया अत्याचारा विरुद्ध कधी बोलनार, लिहीणार आहोत? किती लोक बोलतात, लिहीतात मी वैयक्तिकरित्या बोलण्या,लिहीण्या व चिकित्सेमुळे समंध, मित्र,नाते गमावले आहेत आणि हे निरंतर चालनार आहे कारण जी काही चिकित्सा करतो आहे कुणाला चांगल वाईट वाटावं,आवडाव म्हणून नव्हे तर माझा मनोग्रह जसा आहे तसा मनोग्रह असणारी मानसं आज न उद्या जन्मास येतील कारण काळ हा अनंत आहे आणि पृथ्वी ही विस्तीर्ण आहे.
🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?