ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय.
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
समाजातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ग्रामीण भागातील व झोपडपट्टीतील समाज होय, प्रामुख्याने या भागातील युवावर्ग समाजातील मुख्य प्रवाहा पासून खुपच दुर आहे;मुलभूत सुविधां पासून दुर्लक्ष आहे त्यांना कार्यक्रम नसल्यामुळे ते भरकटत आहे.मोबाईल,मोबाईल गेम,टेलिव्हिजन, क्रिकेट,पानटपरी,चौकातील टाईमपास या विविध कारणांमुळे अनेक युवकांची वाया जात असतात,युवकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व सुविधांच्या अभावी युवक आपले आयुष्य घडवणारी महत्वपूर्ण वर्षे वाया घालवत असतो.समाजातील,कुटुंबातील पालक वर्ग यांना नेहमी नकारात्मक सांगत असतात की, व्हिडिओ गेम खेडू नको,टीव्ही बघू नको, क्रिकेट खेळू नको,पान टपरीवर चौकात जाऊ नको यापेक्षा समाजाने आणि पालकवर्गने युवकांना सकारात्मक काय केले पाहिजे व कुठे जायला पाहिजे हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.*
*समाजाला व युवकांना मुख्य प्रवाहात आणनारा व मदतीची हात देणारा कार्यक्रम म्हणजे "बिहार तिथे अभ्यासिका"आपल्या गावातील विहारात अभ्यासिका निर्माण करून युवकांना अभ्यास करण्याचे ध्येय उद्दिष्टे निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजाने, आईवडील,पालक यांनी युवकांनी अभ्यासा करीता विहार गेलेच पाहिजे असे सकारात्मक सांगणे करीता अभ्यासिका निर्माण होने गरजेचे आहे.*
*ग्रामीण भागात कार्य करण्याचे उद्देशाने व विहार तिथे अभ्यासिका निर्माण करण्याचे उद्देशाने दि.9 जानेवारी 2021 शनिवारला अमरावती जिल्ह्यातील शिरखेड,यावली,अडगाव तर दिनांक 26 डिसेंबर 2020 ला मालखेड,राजुरा,मांजरी म्हसला, नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी विहारांना व समाज घटकां सोबत प्रत्यक्ष कार्य करण्याची व भेटी घेतल्यानंतर अधिकांश विहारांना कुलूप बंद होती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, कर्मकांड यामुळे समाज सम्यक मार्गापासून दुर आहे. सामाजिक चळवळीचे खरे कार्य करण्याची प्रामाणिक गरज ग्रामीण भागात जास्त आहे. ग्रामीण भागातील समाज व युवक परिवर्तनाची वाट बघत आहे या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मदतीचा हात देणे गरजेचे आहे.*
*शहरी भागात समाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्ते,अनुयायी आपल्या सर्वांची जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे की, चळवळ सामाजिक बंधूभाव निर्माण होणे व या घटकांना मुख्य प्रवाहात आणने करिता ग्रामीण भागात जाऊन तेथे बुद्धी,पैसा,वेळ यांचे दान करणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका द्वारा"विहार तिथे अभ्यासिका"या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक व धम्म कार्याचा भाग बना चळवळीचे प्रचारक,प्रसारक बना व समाजाचा आधारस्तंभ बना!*
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
Comments