आपल्या मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...!

आपल्या  मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...!
*14 नोव्हेबर बाल दिना निमीत्य!*
🔥🔥🔥🔥🔥
          *जनहितार्थ....*
Watch & Understand video:-
👇👇👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2412514719008617&id=1552199775040120&ref=dbl&_ft_=mf_story_key.
👇👇👇
https://m.youtube.com/watch?v=AUtVoPxEHTI
   *निरागस लहान मुलांच्या नियमित नैसर्गिक व्यवहारात आकस्मिक बदल घडतो तेव्हा मुल काहीतरी लपवत आहेत अस समजल जात. या मागील वेगवेगळी कारणे असु शकतील परंतु जर शोध घेतल्यास कारण जर त्याचे सोबत वाईट कृत्य लैंगिक शोषण घडल्यास पालकांनी, आई वडीलांनी या गंभीर समस्ये बाबत जागृत असणे आवशक आहे. लहान किंवा अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल माहिती; त्या विषयी अधीक सतर्क होण्याचा व प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच मुलांची,बालकांची सुरक्षीतता या विषयावर सर्व समाजात जागृती निर्माण करणे आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे.*

*बालकांचे अथवा मुलांचे शोषण म्हणजे काय?*
*मुलांच्या शरीराचा झाकलेला, वैयक्तिक पार्ट ज्याला अन्य व्यक्ति द्वारे नकोशा पद्धतीने घाण स्पर्श करणे व अमाणवीय कृत्य करणे होय. मुलांच्या शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा संपर्क,स्पर्श, आणि अशी कोणतीही कृती वा वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल; लज्जित होईल अवमानित होईल असे सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. लैंगिक शोषणाला मुली वा मुले,मंदबुद्धी धर्म, वय, वंश, लिंग, खेड्यात व शहरात, गरीब श्रीमत वा सामाजिक आर्थिक असा निकश नसतो अशा कुठल्याही स्तरातील मूल हे लैंगिक शोषणाला बळी पडू शकतात. समाजात 50% शोषण प्रमाणात 4 पैकी 1 मुलगी किंवा 7 पैकी 1 मुलगा यांनी दुर्वर्तना बद्दल आकडेवारी सांगते. ही गोष्ट निश्चितपणे पालकांना काळजी करायला लावण्यासारखी आहे.*

*असुरक्षित क्षेत्र:-*
  *या क्षेत्रात ज्या व्यक्ति पासुन मुलांना धोखा होऊ शकते अशा ठिकाणास असुरक्षित क्षेत्र म्हणतात. शोषणाला जबाबदार असणारी व्यक्ती ९०% परिचयाची वा ओळखीची असते. यात नातेवाईक, परिचित व्यक्ती आपल्या ओळखीचा व विश्वासाचा फायदा घेते आणि अश्लील कृत्ये करतो बऱ्याचवेळा अशी व्यक्ती महिला पुरुष जे आई वडील आजोबा यांचे मित्र,जवळचे नातलग,शेजारी,परिचित,अनोळखी व्यक्तीपासून मुलांना सावध ठेवणे गरजेचे आहे.*

*सुरक्षित क्षेत्र:-*
*या क्षेत्रात ज्या व्यक्ति पासुन मुलांना सुक्षीतता वाटते अशा ठिकाणास सुरक्षित क्षेत्र म्हणतात. यात आई,आजी,बहीण आजोबा,वडील यांचा समावेश होतो.*

*सर्वेक्षण चे भयावह सत्य:-*
  *5 ते 12 वयोगटातील मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो. लैंगिक शोषण व लैंगिक गुन्हा पुन्हा पुन्हा होत राहिले तर त्याचा त्या पीडित मुला वा मुलीच्या मानसिकतेवर प्रचंड दुष्परिणाम होतो. 50 % पेक्षा जास्त लैंगिक गुन्हे घरातच घडतात जे विश्वासातील,परिचयातील होते. आणि 90 % गुन्हे ओळखीच्याच व्यक्ती करतात. 21% मुलांनी तीव्र स्वरूपाचे लैंगिक शोषण होत असल्याचे नोंदविले तर 50% मुलांनी इतर प्रकारचे लैंगिक शोषण होत असल्याचे सांगितले याचाच अर्थ आपली मुल घरात किंवा विश्वासातल्या, ओळखीच्या लोकांबरोबर सुध्दा सुरक्षित नसतात आणि बहुतेक मुलांनी ह्या प्रकारांची तक्रार कोणाकडेही केली नाही.*

*सामाजिक जागृती:-*
*लहान मुलांवर लैंगिक अत्याचारी करणारी व्यक्ती अत्यंत विश्वस्त व नजीकचा असल्याने कुटुंबाचे संबंध बिघडण्याची भीती किंवा पिढीत मुलाच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ह्या भीतीने अत्याचार सहन करत असतात घरातील मुख्य पुरुष, मोठा माणूस समाजाच्या, कुटुंबाच्या भीतीने ह्याकडे दुर्लक्ष करत असतात तसेच आजूबाजूचे लोक सुद्धा दुर्लक्ष करत असतात जी सामाजिक दृष्टिने खेदाची बाब होय.*

*पालक शिक्षकांची जागृती व उपाय.*

*1)मुलांना अशा परिस्थितीत ''नाही'' "NO" म्हणायला शिकवणे ओरडायला सांगणे*

*2)लहानपणीच पालकांनी मुलींना स्पर्शज्ञानाची माहिती देणे सुरक्षित स्पर्श,गोंधळवणारा स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श ''चांगला'' व ''वाईट'' स्पर्श ह्यांमधील फरक शिकवणे त्याबद्दल समजावून सांगणे स्पर्शा बद्दल त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे.*

*3)मुला मुलीना समजावा की, कोणालाही तुमच्या गुप्तांगांना स्पर्श करण्याचा, दुखापत करण्याचा अधिकार नाही.*

*4)जवळची नाही व अनोळखी व्यक्ती कडून खाऊ, पेय,खेळ,भेटवस्तू इत्यादी घेऊ नये.*

*5)मुलांना चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर १०९८ कसा वापरायचा ते सांगा.*

*6)पोलिसांना किंवा मुलांच्या संरक्षण संस्थांना कळवा. पोलिसांची मदत कशी घ्यावी ते सांगा.*

   *समस्या समाधाना करीता पालक आई वडिल यांनी प्रथमपासूनच मुला मुलींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करावे तुमच्याशी कोणत्याही विषयावर बोलताना त्यांच्या मनावर दडपण येणार नाही असे खेळीमेळीचे वातावरण घरात ठेवावे जेणे करुन मुल मुली न घाबरता तुमच्याशी बोलतील. आपल्या मुलांच्या वागण्या बोलण्यावर त्यांच्या नकळत लक्ष ठेवणे त्यांच्या वागणुकीत काही बदल असल्यास ते पहाणे छेडछाड, विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार होणा-या मुला मुलींच्या वागण्यात अचानक बदल होतो यावर लक्ष ठेवणे आपल्या मुला सोबतच समाजातील अन्य मुलांवर लक्ष ठेवणे खालील video स्वतः व मुलांना समजवून सांगणे*
*जनहिततार्थ..!*

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

The Buddha and his Dhamma Post 54 to 65