सामाजिक गोलमेज परिषद अमरावती एक ऐतिहासिक पर्व
🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय कैशल्याच्या आधारे 1930,1931आणि 1932 अशा तिन गोलमेज परिषदा इंग्लंडला गाजवून देशा करीता, बहुजनां सोबतच सर्व समाजा करीताचा जाहिरनामा कमुनल अवार्ड रँमसे मेक्डोनाल्ड च्या माध्यमातून हक्क व अधिकार मिळवून दिले.या माध्यमातून आज केवळ समाजातील 13% लोकांना नोकरीच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी निर्माण झाले आणि त्याच्या कडे असलेली बचत शिल्लक ही त्यांना अमाप संपत्ती वाटू लागली उर्वरित 87% लोक अद्यापही हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या समाजाला आरक्षण नाही ते कसे प्रगतीशील झाले. काही विशिष्ट समाज आर्थिक दृष्टीने कसा सक्षम झाला आहे. काही समाज विविध क्षेत्रात चित्रपट, गित संगीत, वर्ग एक अधिकारी इत्यादी क्षेत्रात विशिष्टच समाज का? आणि तो कसा प्रगतीशील झाला याचे चिंतन अध्ययन करून एक लक्षात आले की, वरील समाजाने त्यांची त्यांची सामुदायिक प्रगती केली आहे.
एखाद्या व्यक्ती डॉक्टर, वकील, इंजिनिअर,IAS,IPS,IRS,कर्मचारी अशी मोठी पदे प्राप्त केले असतील, मोठ्या डिग्री असतील ही त्या व्यक्तीची वैयक्तिक ओळख प्रतिष्ठा असेल त्यांचेकडे करोडो रुपये असतील पण याने समाजाची Value निर्माण होत नाही. संपन्न समाजाची ओळख निर्माण करणे करीता Innovatively संकल्पना डॉ. प्रशांत रोकडे सर (Additional Commissioner)यांनी दिली आणि ती म्हणजे समाजाची सामाजिक Value निर्माण करणे.समाजिक ओळख निर्माण कशी करता येईल ती सामाजिक गोलमेज परिषदे संकल्पनेच्या माध्यमातून सुरू झाला आहे.
★सामाजिक गोलमेज परिषद काय आहे?:-
समाजिक गोलमेज परिषद ही अराजकीय संकल्पना जी
कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढणारी ही महत्वपुर्ण घटना समाजातील सर्व सामान्य स्तरावरील व्यक्तींना समाजातील सामाजिक,आर्थिक आणि मानसिक समस्यां ओळखून त्यावर सामुदायिक उपाययोजने करीता सहभागी करून पदाधिकारी अध्यक्ष पाहुणे यांना त्यागुन स्वागत हार, डायस, पोडीयम,अधिकारी,कर्मचारी पद प्रतिष्ठा त्यागुन मोठमोठी भाषणां ऐवजी फक्त सामाजिक
समस्येवर उपाय योजना जी समुदायीक नेतृत्वाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांचा समावेशा करीता एकत्र वर्तुळाकार बसून सर्व समाज एका सुत्रांत बांधून सर्व समान पातळीवर सामाजिक भात्रृभाव निर्माण करून समाजाच्या आर्थिक,सामाजिक आणि मानसिक समस्यांवर सामुदायिक रीत्या सहभागी करून चर्चात्मक संवादातून उपाययोजना काढून समाजाला कृती कार्यक्रमावर अंमलबजावणी करीता सहभागी करणार विचारमंच म्हणजे सामाजिक गोलमेज परिषद
होय.
★संकल्पना:-
डॉ.प्रशांत रोकडे सर यांच्या संकल्पनेतून सामाजिक गोलमेज परिषद आयोजन संदर्भात संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेवर कार्य करणे करिता दिनांक 24 डिसेंबर 2023 ला पहिली बैठक घेण्यात आली त्या बैठकीच्या अनुषंगाने अमरावती शहरातील विविध सामाजिक संघटनांना बोलावून भाषणांऐवजी कृती कार्यक्रमावर सर्व संघटनांनी कार्य केले पाहिजे याकरिता सर्व संघटना तयार झाल्या आणि या दिवसापासून सामाजिक गोलमेज परिषदेचा प्रवास सुरू झाला.
कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि मानसिक समस्यांवर कृतीयुक्त व परिणामकारक कार्य करणे करिता समाजातील सर्व संघटना व विविध स्तरातील लोक यामध्ये सहभागी झाले आणि या सहभागाचा परिणाम असा झाला की समाजातील जे कृतीयुक्त कार्य करणारे लोक होते ते पुढाकार घेऊन कार्य करायला लागले.
★सर्व संघटना एकत्र आणल्या:-
घटनांच्या माध्यमातून विविध संघटना आपापल्या पद्धतीने संघर्ष करत आहेत परंतु कृतीशील व परिणामकारक कार्य मात्र थोड्या प्रमाणात येत आहे आणि या संकल्पनेमधून अमरावती शहरातील विविध सामाजिक संघटना एकत्रित करून त्यांच्या माध्यमातून परिणामकारक कार्य करणे करिता एकत्रित आणणे व समाजात नवचैतन्य निर्माण करणे करिता परिणाम कारक बांधणी महत्त्वाची होती. सर्व संघटनांचे विखुरलेपन दुर करुन त्यांना एका स्तरावर एकत्रित आणल्यामुळे सर्व परिणामावर कार्य करणे करिता उत्साहपूर्वक एकमत झाल्याने सामाजिक गोलमेज परिषदेला अधिक परिणामकारक निकाल मिळणे संभव झाले आहे.
ध्येय उद्देश:-
सामाजिक गोलमेज परिषद नियोजनाच्या विविध बैठकीत व गोलमेज परिषद कार्यक्रमात समाजातील सर्व संघटना व संबंधित क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा विचारविनिमय करून काही ध्येय उद्देश ठरले ज्यात खाली महत्वपूर्ण मुद्दे निदर्शनास आले.
१) ५० उद्योजक तयार करणे:-
WE Movement म्हणजे (Wellfare Economy) या माध्यमातून कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक गोलमेज परिषदेच्या दिवशी खालील उद्योग व उद्योजक तयार करून ते आज रोजी चालवले जात आहे.परिषदेच्या दिवशी वरील उद्योग स्टाल द्वारे प्रदर्शित करण्यात आले ते खालील प्रमाणे.
१)WE MALL:-
लेन नं.४ बाजी लॅंड अमरावती
२)WE MART:-
गोविंद विला, तपोवन गेट जवळ अमरावती
३)WE COSMETIC:-
यशोदा नगर अमरावती
४)WE FOOD:-
किशोर नगर अमरावती
५)WE GRAINS:-
केवल काॅलनी
६)WE OIL MILL:-
मोर्शी रोड अमरावती
७)WE DAL MILL:-
MIDC, नांदगाव पेठ अमरावती
खालील उद्योग सुरुवात करण्याचे नियोजन सुरू आहे.
८)WE. BANK:-
९)WE STOCK EXCHANGE INFORMATION CENTER:-
१०)WE HEALTH:-
११).WE INFORMATION:-
१२)WE EDUCATION
★)एका वर्षात १००० विद्यार्थी शासकीय नोकरीत लागणे करीता मदत करणे.
★)प्रत्येक रविवारी समाजातील प्रत्येकाने बुद्ध विहारात जाणे.
सामाजिक गोलमेज परिषदेचे ध्येय व उद्देश पूर्ण करण्यासाठी समाजातील जबाबदार घटक जबाबदारी घेऊन कृती कार्यक्रमावर काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
★समाजिक गोलमेज परिषदे करीता जे नियोजित ध्येय साध्य व सफल करने करीता दि.२४ नोव्हेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत डॉ.प्रशांत रोकडे सर यांनी रजा काढून स्वतः ला झोकून देत तळमळीने कार्य केले त्यांनी सामाजिक प्रेरक म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा दिल्याने समाजातील कृतीशील वर्ग तयार होते आहे. सामाजिक बदला करीता समाजातील तळमळीने कार्य करणाऱ्या लोकांच्या सहभागामुळे बैठकी आणि परिषदेत सहभागी वर्ग अत्यंत गांभीर्याने चर्चा सत्राला पुढे घेऊन जात खिळून बसने व परिणामकारक कार्य केले ते परिवर्तनाच्या अपरिहार्यतेचे एकमेव उदाहरण होय. मागील 50 वर्षापासून समाजाच्या प्रबोधना करिता आम्ही वेळ दिला आता सामाजिक व आर्थिक ध्येय गाठण्यासाठी समाजाचा वर्ग आज स्वतः सहभागी होऊन सामाजिक दिशा ठरवत आहे हीच खरी परिवर्तनाची नांदी होय. या कालावधीत निर्माण झालेला सकारात्मक प्रभाव सामाजिक परिवर्तना करीता अपरिहार्य झाले आहे. जसे उद्या सूर्याचे उगवणे जेवढी अपरिहार्य आहे तसेच परिवर्तनाच्या बदलाचा जो इतिहास लिहिला जाणार आहे तो सुद्धा अपरिहार्य असणार आहे आणि समाज तो बदल अनुभवतो आहे. इतिहास वाचून इतिहास अनुभवनं गोलमेज परिषदेने इतिहासाचा एक धागा पकडत कार्यक्रमाने धड्याचे एक पान लिहीलं गेल आहे. सामाजिक गोलमेज परिषदेच्या सक्रिय सहभागामुळे समाजात ऊर्जा समर्पण,सहभाग आणि आशावाद निर्माण झालेला आह.यामुळे इतिहास बदलत आहे ही चळवळ सुरक्षितपणे पुढे गेली पाहिजे असे सर्वांना वाटत आहे.
Comments