आचार्य_अत्रे_यांचे_भाषण व बौद्ध_धर्म_दीक्षा

#6_डिसेंबर_1956_महापरिनिर्वाण_दिवशी
🔥#आचार्य_अत्रे_यांचे_भाषण व
🔥#बौद्ध_धर्म_दीक्षा 
💐🌷🌷🌷💐
      मुंबई शुक्रवार दि.7/12/1956 सायंकाळी सात वा. दादर चौपाटीच्या समुद्र किनारी 10 ते 12 लाख लोकांच्या साक्षीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहाला अग्नीसंस्कार देण्यात आला. अग्नीसंस्कारा पुर्वी लंका, मलाया, ब्रम्हदेश येथून आलेल्या भिख्खूंची प्रवचने झाली.
 
#बौद्ध_धर्म_दीक्षा 
    दादासाहेब गायकवाड यांनी शोकाकुल बांधवांना उद्देशन भाषण केले ते म्हणाले की, "दि.१६ रोजी लक्षावधि अस्पृश्यांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी बाबासाहेब येणार होते. पण दुर्देवाची गोष्ट की ते अशा त-हेने आज आपल्या येथे आलेले आहेत. म्हणून ते येऊन जे कार्य करणार होते ते याच ठिकाणी त्यांच्या पवित्र देहाला साक्ष ठेऊन आपण करूं या. म्हणून मिख्खु आनंद कौशल्यायन योनी धर्मान्तरांचे काम आतां सुरु करावे अशी विनंती करतो". 

    "ज्यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा असेल त्यांनी हातवर करावे!" त्याबरोबर पाच लक्ष हात वर झाले. मग बौद्ध भिख्खुंनी सांधिक प्रार्थना व पंचशीला म्हणायला सुरवात केली. त्यांचे पुन:उच्चारण लाखों कंठांतून निघाले. त्यानंतर श्री.शंकरानंद यांनी बौद्ध धर्माच्या पालनाचे नियम सर्वांना सांगितलें त्याचा सर्वांनी पुनरुच्चार केला.धर्मांतराचा विधी पुर्ण झाल्यानंतर आचार्य अत्रे यांचे भाषण झाले ते म्हणाले.
#आचार्य_अत्रे_यांचे_भाषण 
       "महाराष्ट्रांतील पत्रकारांच्या व लेखकांच्या वतीने मी हे अखेरचें अभिवादन करीत आहे. बाबासाहेबांचा मृत्यु म्हणजे एका महान् जीवनाची समाप्ति झाली. आज अन्यायाच्या प्रतिकार शक्तीचे एक पर्व संपले. महान पुरुषांचे मरण पाहूं नये असे म्हणतात , पण हे थोर पुरुषाचे मरण पाहाला भाग्य लागते. बाबासाहेबांची अन्यायाविरोधी व जुलूमा विरोधी प्रतिकार करण्याची ताकद पाहून आकाशांतील देवांना हेवा वाटला असावा आणि या युगपुरुषाला त्यांनी हिरावून नेला असावा. बाबासाहेब हे हिमालयासारखे महान् असून असा बुद्धिमान आणि कर्तबगार पुरुष आजपर्यंत जन्मला नाहीं व यापुढे कित्येक शतकांतहि जन्मेल असें वाटत नाही. याक्षणी त्यांचे सारें चरित्र माझ्या नजरेसमोर उभे राहात आहे. त्यांचे चरित्र हे झंझावातासारखे आहे, प्रचंड वादळासारखे आहे . असा हा शुर वीर परवां रात्री सारे जग झोपी गेलें असतां शांतपणे मृत्यूच्या मांडीवर झोपी गेला. आयुष्यांत ढोंग, जुलूम, अन्याय याविरोधी सदा या भीमानें उगारलेली गदा होती. बाबासाहेब हिंदु धर्माच्या विरोधी नव्हते. त्यांना हिंदु कोड बील करायला संधि मिळाली असती तर निश्चित हिंदुंचा फायदाच झाला असता. तें बिल जर संमत झाले असते तर आज कोट्यावधी लोकांनी धर्मोतर केले नसते. याचा हिंदूंनी पश्चाताप केला पाहिजे. त्यांनी काँग्रेस व गांधींवर टीका केली. परंतु त्याच गांधींना उपोषणांतून बाबासाहेबांनींच बांचविले आणि आपला उमदेपणा दाखविला. बाबासाहेबांचे तीन महान् गुरू असून ते त्यांचे पक्के चेले होते. महात्मा फुले , कबीर व बुद्ध या गुरु पासून त्यांनी विद्या संपादन केली होती.
या महान् पुरुषाविषयी बोलावे तेवढे थोडे आहे. त्यांनीं मनुस्मृति जाळली , परंतु ते स्वतंत्र भारताची घटना बनविणारे स्मृतिकार झाले. त्यांच्या मृत्यूने अस्पृश्यांचा तर पालनहार गेला आहे. मुंबईच्या लढ्याचा आमचा आघार गेला. अखिल भारताचा उद्धारकर्ता गेला. आपण धीर सोडून चालणार नाही . त्यांचा प्राण शरीरांतून जरी निघून गेला असला तरी त्यांच्यातील प्राण तरी आज दहा कोटी लोकांच्या शरीरांत शिरला आहे. बाबासाहेबांचा आदर्श ठेवून त्यांचें कार्य आपण पुरे केलें पाहिजे.” आचार्य अत्रे यांचे भाषण चालू असतां हजारों स्त्री - पुरुष अक्षरशः दुःख व्याकुलतेनें रडत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दगणिक लोकांच्या हृदयांत उमटलेल्या दुःख लहरी अश्रूरूपानें नेत्रांतून गळत होत्या.

#बौद्ध_पद्धतिने_अग्नी_संस्कार

     भिख्खू एच.धम्मानंद व भिख्खु बुद्धरक्षित एम थेरा यांनी लंकेतील पंधरा नामवंत भिख्खुंच्या सहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यसंस्कार पार पडला. बाबासाहेबांच्या नातेवाईकांनी भिख्खुंना पंसकुर (पांढरेवस्त्र)दान केले. त्यानंतर 'पुण्यानुमोदन' म्हणजे श्रेष्ठ उपासका बद्दल अपार सहानुभूती व्यक्त करुन त्यांला शांती लाभो असे इच्छिण्याचा विधी झाला अखी परंपरेनुसार अशास्वतेची शिकवण देणा-या खालील बौद्ध धर्मस्तोत्राचे पठन झाले.

अनीच्यवत् सांखरा 
उपपद वच धम्मिनो 
अप्पज्जित्वा निरंजयंती 
ते संवूपा समोसुखा

(अर्थ- सर्व वस्तुजात अशाश्वत आहे. उन्नति व पतन हा त्यांचा स्वभावधर्मच आहे. उन्नत होऊन त्या निश्चितपणे नष्ठ होतात. या उन्नती - पतनाच्या अवस्थेतून मुक्तता हेच एकमेव सर्वोच्च सुख आहे.)

 बौध्द धम्मा रिती रिवाजाप्रमाणे प्रमाणे चंदनाच्या चितेवर ठेवून चिरंजीव व पुतण्या ने अग्नीसंस्कारा केला. त्या सुमारास पोलिसांनी बंदुकांचे बार उडवून मानवंदना केली व बँन्ड वाजवीले.
    डॉ.बाबासाहेब यांच्या महानिर्वाणाची मिरवणूक त्याच दिवशी दुपारी निघालेली शिस्तबद्ध शांततापूर्ण व प्रचंड महायात्रा मुंबईकरांच्या कायम राहणारी जी तीन मैल लांबीची महायात्रा पोलीस व समता सैनिक दलाच्या सहाय्याने साखळीची उत्कृष्ट व्यवस्था केली ज्यांना महार रेजिमेंट च्या सैनिकांनी मदत केली.
संदर्भ:-
प्रबुद्ध भारत 29/12/1956

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?