राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका व शासकीय धोरण

राष्ट्रपिता_ज्योतिबा_फुले_अभ्यासिका_व_शासकीय धोरण
🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨
       राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णय संकीर्ण 2021/प्र.क्र 79/ अजाक दि.6/10/2021 नुसार अनुसूचित जाती आणि नव बौद्ध वस्तीचा विकास योजनेच्या सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वाचनालय सेवा उपलब्ध व्हावी या करीता "संविधान सभागृह" शासकीय नवी योजना तयार करण्यात आली आहे. तसेच समाज घटकाांपयंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्या करीता अभ्यासिका सुरु करणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहिचवणे यासाठी राज्यात ग्रंथालय व अभ्यासिका यासारख्या अद्ययावत सुविधांसह “संविधान सभागृह” सुरु करण्यास शासकीय मांजूरी प्रदान करण्यात आली आहे.
सन 2012 पुर्वी अभ्यासिका या शब्दा ऐवजी वाचनालय,लायब्ररी असा शब्दप्रयोग केला जात असे 2012 नंतर डॉ.प्रशांत रोकडे सर यांनी अभ्यासिका असा शब्दप्रयोग केला आज ठिक ठिकाणी समाज अभ्यासिका असा शब्दप्रयोग करत आहे. पुर्व नालंदा विद्यापीठात तिन अभ्यासिका होत्या रत्नोदय,रतनोदधी आणि रत्नरंजक जेथे पुस्तकालय,अभ्यास करायला अभ्यासिका ज्यात विद्यार्थी अध्ययन व अध्यापन करत असत हेच ध्येय घेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेने समाजात अभ्यास संस्कृती निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे.
       वरील शासन निर्णायाचे ध्येय उद्दीष्टे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेने 6 मे 2012 ला कलोतीनगर अभ्यासिका अमरावती येथे डाँ.प्रशांत रोकडे सर(IRS)व त्यांच्या टिमने ध्येय निश्चित केले होते आणि आज महाराष्ट्र ग्रामीण शहरी व झोपडपट्टी भागात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका वरील कार्यक्रम योजनाबद्ध पद्धतीने राबवित आहे. अभ्यासिकेचे अंतिम ध्येय महापुरुषांची विचारधारा रुजवणे तसेच माणवकल्याण व समाजाचा सर्वांगीण विकास करणे हा होय. 
        डॉ. प्रशांत रोकडे सर{IRS} (Joint Commissioner Revnue Delhi) व अमरावती येथील त्यांचे सहकारी मित्र यांना अभ्यासला पुस्तके,लायब्ररी व अभ्यासाचे अनुकूल वातावरणाचा अभाव होता तेव्हा त्यांचे जे बेहाल झाले तसेच अभ्यासाकरिता संघर्ष करावा लागला तसे कष्ट इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, या उदात्त हेतूने त्यांनी समाजातील संसाधन रहीत, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही शासकीय मदत न घेता केवळ 'Pay back to society' या संकल्पनेवर स्व: खर्चातून मोफत व निशुल्क तत्वावर, 6 मे 2012 ला बुद्ध पौर्णिमेला कलोतीनगर अमरावती येथे आपल्या मित्रांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरू केली.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा संदेश "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही" डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश "शिक्षण हे वाधीणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहाणार नाही" "शिका,संघर्ष करा,संघटीत व्हा" ज्ञानार्जन,स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी तयारी म्हणजे अभ्यास अभ्यास अभ्यास हाच एकमेव पर्याय होय झोपडपट्टी व ग्रामीण भागातील संसाधन रहीत गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अनेकदा इच्छा असूनही जागेअभावी,साधनां अभावी अभ्यास करता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका टिमने अभ्यासिका संकल्पनेचा विस्तार म्हणजे "विहार तिथे अभ्यासिका" कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज शिक्षणाचा बाजार मांडलेल्या गर्दीत, महाराष्ट्रात विविध 48 ठिकाणी डॉ. प्रशांत रोकड सर व त्यांची टिम तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण कोआर्डीनेटर त्यामुळे दीपस्तंभ ठरले आहेत.
        महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या उद्दिष्टांची ध्येयपूर्ती करण्याचे पाऊल उचलले असले तरी शासकीय स्तरावर योजनेच्या अंमलबजावणीवर कस लागणार आहे कारण या पुर्वी शासनाने अभ्यासिकेवर आधारित अनेक कार्यक्रम अंवलंबले गेले जसे,
1)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावरील पोलीस ठाण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका.
2)एक गाव एक सौर अभ्यासिका.
3)जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून अभ्यासिका.
         शासकीय बरेच प्रयोग अंमलबजावणी केल्यानंतर आता "संविधान सभागृह" योजना जी अत्यंत महत्वपूर्ण योजना हाती घेतली आहे अभ्यासिकेचे सर्व कोआर्डीनेटर निश्चितच योजनेचे स्वागत करतं आहे योजनेचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवने करीता कटिबद्ध आहोत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संविधान सभागृह या योजनेच्या लाभाने निश्चितच समाजातिल विद्यार्थ्यांचे जीवन बदलेल असे चिंतन करून शासनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकडून हार्दिक शुभेच्छा.
 

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?