आपले संघटन या तत्वावधानाने १०१% यशस्वी करता येते!!

☄☄☄☄
आपले संघटन या तत्वावधानाने १०१% यशस्वी करता येते!
☄☄☄☄

     अनुयायी कार्य करतीत असतांनी संघटनेत मतभेद निर्माण होत असतात ते दुर सारण्या करीता प्रत्यक्ष अनुभव शेयर करत आहे. आपल्याला प्रत्यक्ष कृती करन्या खेरीज पर्याय नाही. राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिका अमरावती जी २०१२ पासुन महाराष्ट्रात ४८ ठिकाणी "विहार तिथे अभ्यासिकेच्या" माध्यमातुन टिम समाजाला निस्वर्थ व निशुल्क सेवा देत आहे. आपण जिथे सामाजिक कार्य करत असाल तिथे प्रत्येक व्यक्तीने खालील व्यक्तिगत व सामूहिक जबाबदारी करीता तयार रहावे व परीवर्तनाचे चक्र गतीमाण करण्याची जबाबदारी स्विकार करावी.

समाज व संघटने चे मुलभुत तत्वे.

कार्य पुर्णत्वास नेने, ध्येय उद्देश्य गाठणे करीता या महत्वपूर्ण गोष्ठी वर आपल्याला कार्य करणे आवशक आहे.

१)आपले प्रामाणिक प्रचारक व प्रसारक असावेत. आम्ही ते बनु शकतो, निर्माण करु शकतो, सम्वयाने.

२)आमचे अभ्यासक असावेत. आम्ही अभ्यास करु शकतो, विहार तिथे अभ्यासिकेत अभ्यासक निर्माण करु शकतो.

३)आमचे प्रशीक्षक असावेत. आम्ही समाजातील गरजुवंतांना योग्य प्रशिक्षण देऊन फुले शाहु आंबेडकर विचारांची पिढी निर्माण करु शकतो.

४)आपण सर्व लोक धम्म आचरणशील करणारे असावे.आम्ही आधीकाधीक जास्तीत जास्त धम्म आचरण करन्याचा आटोकाट प्रयत्न करु शकतो व दुसऱ्यांना तशी प्रक्षेपण देऊं शकतो.

५) महापुरुषांचे जयंती स्मृतिदिवस साजरे करणे खाद्य पदार्थ वाटप म्हणजे परिणामकारक कार्य नव्हे काल पर्यंत आपण केलेल्या कार्याचा खरोखर परीणाम मिळाला काय? म्हणुन वरील दिवसाला परीणामकारक कार्य करन्याचा संकल्प घेऊन कार्याचे नियोजन करुन कार्याचा संख्यात्मक परीणाम मिळवणे करीता त्याग परीश्रम व बलीदान देऊन आंदोलन उभे करता येईल आणि आपण ते करु शकतो.

६)वज्जीसंघ (Formula बुद्ध &धम्म) संदर्भा नुसार वरचे वर मिटंग,सर्वानुमते निर्णय,सर्वांचा आदर व सन्मान धम्माचरण व नैतिकता संघठनेत असणे हे संघटन यशाचे गमक होय आणि असे आम्ही करु शकतो.

७)अध्यक्ष सचीव हे फक्त तांत्रिक बाब सोडवणे करीता नाममात्र पदे असावीत आपला खरा उद्देश्य पद पैसा प्रतीष्ठा अहंकार बँनर पोस्टर,प्रसिद्धि हे सर्व सोडुन केवळ संघठन चा पाया कसा मजबूत करता येइल कसे प्रचारक प्रसारक वाढवता येईल कसे अभ्यासक वाढतील, समाजाला Time Treasury & Talent देणे म्हणजे Payback करणे या तत्त्वावर संगठन निर्माण करु शकु अशा या कार्यातुन आम्हाला काहीच मिळनार नाही आम्हाला समाजाला केवळ द्यायच आहे अशी माणसिकता ठेवून समाजात बंधुता, भातृत्वाची भावना निर्माण होणे करीता कुणाचाही द्वेश न करता राजकारन न करता फक्त समाजकारण ज्यात शासनाचा कुठलाही फंड न घेता समाजाच्या ५% उत्पन्न २० वा भाग दानाच्या च्या भरवशावर संगठन १०१ % यशस्वी पणे उभं करता येऊ शकते या Formula डॉ.बाबासाहेब यांचे १८ मार्च १९५६ आगरा भाषण या Formula वर आधारभूत आहे याने समाज आपल्याला मदत सुद्धा करते परंतु स्वतःला आधी त्याग समर्पण आपल्या कार्यातुन सिद्ध करुन दाखवणे गरजेचे आहे.
     चला आजच आपल्या कार्यास सुरुवात करुया. डॉ.बाबासाहेबांचे कार्य अधीक गतीमान करु या!

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?