क्रांतीवाद आणि प्रतीक्रांतीवादातील फरक न समझणे म्हणजे डॉ.बाबासाहेबांच्या तत्वांना तिलांजली देणे होय. @_sUREn_मेश्राम अमरावती
क्रांतीवाद आणि प्रतीक्रांतीवादातील फरक न समझणे म्हणजे डॉ.बाबासाहेबांच्या तत्वांना तिलांजली देणे होय.
🔹🔹🔹🔹
*समाजाचे कल्याण फुले, शाहु, आंबेडकरवादी तत्वज्ञानच करु शकते असा ठाम विश्वास निर्माण करणे वा निर्माण होणे करीता प्रयत्न करणे आवश्यक आहे परंतु समाजातील स्वार्थ, व्यक्तीगत स्वत्व जपणारी आत्मकेन्द्री लोकवृत्ती जी या विचारधारे करीता व सामाजीक उन्नती करीता विघातक ठरणारी कृती करत असतात. क्रांतीवाद म्हणजे बुद्ध तत्वज्ञाणापासुन तर फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारधारे पर्यंत जी स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय या माणवीय मुल्ये जपणारी तत्वे होत तर प्रतीक्रांतीवाद म्हणजे वरील विचारधारे विपरीत व विरोधी कृती होय.*
*व्यक्तीवाद आणि समाजवाद यात व्यक्तिवादाला व आत्मकेन्द्री वृत्तीला खतपाणी घालुण मोठे करणारे व्यक्ती, व्यक्तीवादाला, स्वत्वाला अवाजवी महत्व देत असतात. व्यक्ती कुणीही असो, किती ही मोठा वा प्रिय असो अशा व्यक्तीं करीता वैचारीक तत्वांशी व विचारधारेशी तडजोड म्हणजे क्रांतीवादाचा खुन करुण तो संपवणे होय.आमचे आदर्श जर प्रतीक्रांतीवादी जे अनैतिक विचारधारेचे प्रतीनीधित्व करणारे असतील आणि त्यांची विचारधारा वर वर सुधारवादी वाटत असली तरी समस्यांचे समुळ उर्मुलन करण्याची ताकद फक्त फुले, शाहु, आंबेडकर या महापुरुषांच्या क्रातीवादी विचारधारेतच आहे.*
*प्रतीक्रांतीवादाचे तत्व देव, दैव, भाग्य, प्रारब्ध, नशीब, ऊच निच, अंधश्रद्धा हे अधीष्ठाण जर व्यक्तीचे व समाजाचे भविष्य ठरवत असतील तर आमच्या विवेकाचा, बुद्धीचा व मणगटाचा काय उपयोग? वरील सर्व तत्व हे प्रातीनीधीक स्वरूपाचे आहेत आणि या विचारधारेवर मागील पाच हजार वर्षांपासून अवीरत संघर्ष सुरु असुन स्वतंत्र समता बंधुता न्याय या माणवीय तत्वांना मिटवन्या करीता निरंतर संघर्ष सुरु आहे. क्रांतीवादी विचारधारा समजायला विवेक व प्रज्ञेची गरज असते या संघर्षात प्रतीक्रांतीवाघ्यां सोबत फुले, शाहु, आंबेडकर यांच्या रक्ताची माणसं स्वतःच्या मता प्रमाणे वागुन व असे आत्मकेन्द्री वागणे हेच योग्य आहे जे विचारधारेची पायमल्ली करणारे असते अशी लोक आपल्या आयुष्यात कधीही महापुरुषांचे साहित्य वाचलेले नसते जी लोक आपला शालेय अभ्यासक्रमाचे वाचन करु शकत नाही त्यांनी खरोखर महापुरुषांच्या विचारधारेचे आकलण केले असेल काय? आणि मग अशा व्यक्ति स्वतःच वर वर चांगल वाटनार अर्धवट ज्ञाण हे समाजाचे मत म्हणुन शिक्कामोर्तब करुण वर्तण करत असतात असे अर्धवट अज्ञानी व्यक्ती हे सामाजिक रथ हा मागे खेचत असतात म्हणून समाजात विवेकशील, सदाचारी व वैचारिक अधिष्ठान ठेवनारे कमीच असतात या वृत्ती बाबत म्हंटलजातं की,* 'सामाजिक धोरणात चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर आव्हान वा बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते त्यांच्यातच सामाजिक हित जोपासन्याची सम्यक जागृती देखील असते, व्यक्ती वा अनुयायी यांना एंकट पडन्याची भिती कधीच नसते परंतु ज्यांना लाचार, विवेकहीण व गुलाम म्हणुन जगण्याची सवय असते असे माणसीक गुलाम समाजहीतास विघातक ठरत असतात', *कारण खोटा देखावा दुस-यांची मर्जी, साभाळुन, दुस-याचा अहंभाव सांभाळून, लाचारी पत्कारणारी माणसे जी प्रतीक्रांतीवादाला खतपाणी घालतात व व्यक्ति पुजेला महत्व देतात अशी अनैतिक व लाचार माणसे जी फुले, शाहु, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेला प्रतीक्रांतीवादी विचारांशी सांगड घालुण समाजिक आरोग्यात जहर मिसळवत असतात या प्रकारचे प्रतीक्रांतीवादी लोक जोडण्यापेक्षा ती काही काळ लांब ठेवणे कधीही सकारात्मक, कारण या प्रवृत्तची लोक व्यक्तीपुजक स्वार्थी व आत्मकेन्दी असतात.*
*क्रांतीवादी, स्वाभीमाणी जे स्वतंत्र,समता,बंधुता व न्याय या वैश्विक माणवीय मुल्ये जपणा-या तत्वांना महापुरुषांच्या विचारधारेचा अट्टहस करणारी वृत्ती प्रती कुणी संभ्रमीत होतील, ही वस्तुस्तीती, कुणी समजुन घेवो अथवा न घेवो निरंतर सम्यक कार्य करत राहणे आजच्या प्रतीक्रांतीवादाच्या परीस्तीतीत आवश्यक आहे. स्वाभीमाणी, प्रामाणीक अनुयायी अंशता: निशक्रीय असला तरी चालेल परंतु सक्रीय असलेला कार्यकर्ता अकुशल , व्यभीचारी, अनैतिक व्यवहार करणारे कितीही उच्चशिक्षीत, सुशीक्षीत व धानाढ्य असतील तरी ते सामाजिक आरोग्यास व धम्मास घातक ठरत असतात आणि अशी लोक विचारधारा दुर सारुण जाणीव पुर्वक प्रतीक्रांती युक्त कृती करत असतात अशा शेनातल्या किड्यावर अधीक वेळ वाया घालवुन त्याला समजवण्याची कृती करणे म्हणजे आपला अमुल्य वेळ वाया घालवने होय त्या पेक्षा नवीन सकारात्मक व्यक्ती शोधुन निस्वार्थपणे कार्यास लागणारे डॉ.बाबासाहेब व महापुरुषांचा त्याग समर्पण व बलीदाणाचे महत्व जाणनारे प्रचारक, प्रसारक, अभ्यासक व आचरण करणारे अनुयायी प्रतीनीधी तयार करणे अधीक गरजेचे आहे. असे सकारात्मक कार्य माणवमुल्ये जपायला मदत करतात म्हणुन क्रांतीवाद आणि प्रतीक्रांतीवाद समजुन घेणे करीता डॉ.बाबासाहेबांचा ग्रंथ क्रांती आणि प्रतीक्रांती चे वाचण करुण आकलन होणे गरजेचे आहे.
Comments