मेंटोर सिस्टीम
अभ्यासिकेत परिणामकारक मेंटोर सिस्टम Mentor System
🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨
राष्ट्रपिता ज्योतबा फुले अभ्यासिका RJPA आणि अभ्यासिकेत मेंटोर सिस्टम विकसित करणे म्हणजे चळवळ आंदोलनाच्या प्रचारक प्रसारक आणि अभ्यासकांची निर्मिती करणे होय. RJPA अभ्यासिका आंदोलन मागील दहा वर्षांपासून परिणामकारक व यशस्वी पणे पुढे जात आहे.
मेंटोर सिस्टीम म्हणजे काय? ज्यांना जे ध्येय,उद्देश आणि महत्त्वाकांक्षा पुर्ण करायची आहे ते पुर्ण करण्यास सकारात्मक व विधायक मार्गाने मदत व मार्गदर्शन करणे म्हणजे मेंटोर सिस्टीम होय.
दोन हजार पाचवें वर्षापुर्वी तथागत बुद्ध यांनी प्रथमच पाच परीव्रज्यक यांना धम्म सांगितला मार्गदर्शन केले होते हेच गुरु व शिष्याचा समंध म्हणजे मेंटोर सिस्टीम होय. धम्मात कल्याण मित्र संकल्पना आहे जी वरीष्ठ भिक्खू द्वारा नवीन भिक्खूंना श्रोतापन्न होणे, सकृदागामी होणे, अनागामी होणे आणि अर्हत पद प्राप्त होणे करीता मार्गक्रमण करण्यास मदत करणे म्हणजेच आजच्या परीभाषेतिल मेंटोर सिस्टम होय.
अभ्यासिकेत ध्येय उद्देश्य प्राप्ति करीता मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थि व कोआँर्डीनेटर यांना स्वतःचे ध्येय उद्देश प्राप्त करण्यासाठी समर्थन देणे आणि प्रोत्साहित करणे जेणेकरून ते त्यांची क्षमता वाढवू शकतील, त्यांची कौशल्ये विकसित करू शकतील, त्यांची कामगिरी सुधारू शकतील आणि त्यांची स्वप्ने आणि महत्वाकांक्षा पुर्ण करण्यात मदत करुण प्रोत्साहन देणे म्हणजे प्रभावी कार्य करणे होय नियोजित ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार शिकवण्या करीता अतिरिक्त सामर्थ्य निर्माण करण्यासह, त्यांच्यात वैयक्तिक सामर्थ्य वाढवीणे करीता वैयक्तिकरित्या नियोजन करुन वापरायचे शिकणे म्हणजे ध्येय उद्देश गाठण्याचा मार्गक्रमण करणे होय.
समस्या सोडवणे करीता मेंटोर मार्गदर्शनाच्या तिन मुलभूत बाबी:-
1)मेंटोर ची उपलब्धता
2)विश्लेषणात्मक दृष्टिकोण
3)सक्रिय श्रोता व दुसऱ्याचे ऐकण्याची क्षमता
यशस्वी मेंटोर मार्गदर्शनाची गुरुकिल्ली:-
1)स्पष्टता
2)सुसंवाद
3)वचनबद्धता
मेंटोर मार्गदर्शन संवादात्मक व चर्चेसाठी खुले ठेवत जे खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी,चर्चात्मक व मुक्तपणे प्रोत्साहन देत पुढील व्यक्ती चा विश्वास हस्तगत करण्याचा प्रयत्न करणे सोबतच वैयक्तिक अनुभव वा कठीण प्रसंगांचा सामावेश करणे व उदाहरण देणे आवश्यक आहे. चांगला व प्रभावी संवाद साधणे ऐकण्याचे कौशल्य, पाठपुराव्याचे कौशल्य असणे आणि रचनात्मक अभिप्राय देणे आणि परिणामकारक सल्ला देणे. मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी यांच्याशी जुळण्यासाठी संरचित कार्यक्रम तयार केले जातात ज्यात औपचारिक मार्गदर्शन,नैसर्गिक मार्गदर्शन,वरीष्ठ किंवा गुरू चे मार्गदर्शन,समवयस्काचे मार्गदर्शन, परिस्थितीविषयक मार्गदर्शन, पर्यवेक्षी मार्गदर्शन,प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन.
यशस्वी मेंटोरशिप समंधी मार्गदर्शनाचे चार टप्पे:-
1)विषयाची तयारी करणे
2)वाटाघाटी करणे
3)समर्थता तथा सक्रीयतेत वृद्धी
4)समारोप करणे
मेंटोर सेशन यशस्वी करीता:-
1)चांगली तयारी करणे आणि स्पष्ट ध्येय उद्दिष्टे निश्चित करणे
2)मेंटोर आणि मेंटी यांना सत्रातून काय साध्य करायचे आहे याची सामायिक समज असणे
3)प्रामाणिकपणे संवाद साधणे
4)सत्राचा अवधी कालावधी सोईस्कर ठेवणे
5)कृती आणि पाठपुरावा याची समीक्षा करणे
मेंटोरशीप कार्यक्रम तयार करण्यासाठी पाच पायऱ्या:-
1)कार्याचे ध्येय निश्चित करणे
2)कार्याचे ठिकाणी मेंटोरशिप व कार्याची रूपरेषा तयार करणे
3)कार्यात सहभागी लोकांची निवड
4)Mentors आणि Mentees यांच्या जोळ्या जुळवणे
5)Mentorship प्रशिक्षण देणे
mentors आणि mentees दोघांनी त्यांच्या संवादात खालील कौशल्यांचा वापर केला पाहिजे:-
1)ऐकण्याचे कैशल्य
mentees चे सक्रियपणे ऐकणारा mentors हा सर्वात प्रभावी मार्गदर्शन असतो
2)विश्वास निर्माण होणे,
प्रोत्साहन देणे,
ध्येये आणि उद्देशाची ओळख करणे
3)सूचना देणे व क्षमता विकसित करणे
4)सुधारात्मक अभिप्राय प्रदान करणे
5)प्रेरणादायी बाबी सांगणे
6)आकलन क्षमता वाढवणे
समाजाला प्रभावी पणे तयार करणे करीता प्रत्येक अनुयायी कार्यकर्ते यांनी समाजात Mentors म्हणून जबाबदारी घेणे व नवीन Mentees निर्माण करून चळवळ,आंदोलनाला प्रभावी परिणामा करीता व चळवळीची ग्लाणी दुर करणे करीता प्रभावी प्रचारक, प्रसारक व अभ्यासक निर्माण करणे करीता अनुयायी यांनी नियोजित पद्धतीने कार्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
Comments