जुनी पेंशन संघर्ष

न्यायालयीन NPS पेंशन फायटर यांचा संघर्ष आज कालचा नसून मागील दहा वर्षाचा आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
      *न्यायालयीन जागृत कर्मचारी मागील दहा वर्षांपासून संवैधानिक पद्धतीने जुनी पेंशनचा लढा लढण्याचा प्रयत्न करत न्यायीक कर्मचाऱ्यांत जागृतिची मशाल तेवत ठेवणे करीता जन आंदोलन व संवैधानिक मार्गाने मागील दहा वर्षां पासून जमेल त्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत ज्यचा परिणाम सकारात्मक दिसत आहे.*
       *जुनी पेंशन सर्वांना मिळावी या करीता आपण सर्व न्यायालयीन कर्मचा-यांनी जागृति गतिमान होत असतांना DCPS/NPS महसूल, मध्यवर्ती व शिक्षक कर्मचारी मरण पावले त्यांचे कुटूंबाला आर्थिक आधार नव्हता अशा वेळी विविध पेंशन हक्क संघटनेने आर्थिक आधार दिला.*
*काही मृत कर्मचाऱ्यांच्या परिवारास मुलभूत गरजा पुर्ण न होणारी अल्पशी पेंशन मिळाली जी परिस्थिती विदारक होती याच दरम्यान औरंगाबाद खंडपीठात महसूल व इतर संघटनेच्या याचीका सुद्धा खारीज झाल्या होत्या या काळात कर्मचा-यांना आशेचा किरण निर्माण होणे गरजेचे होते आणि कर्मचारी जागृती करीता महाराष्ट्र पेंशन हक्क संघटना ज्यात  हजारो विविध संघटनां सोबत घेत जागृती निर्माण केली ज्यात अमरावती न्यायालयीन कर्मचारी पेंशन फायटर हे देखील शामिल होते.*
     *दि.21 आँगस्ट 2016 सर्व संघटनांनी मिळून वसंत हाँल अमरावती येथे विभागिय महामेळा महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटने द्वारा कार्यक्रम आयोजित केला आणि या दरम्यान विविध संघटनांच्या मा.मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केल्या या दरम्यान न्यायालयी कर्मचारी व महासंघ यांच्या NPS प्रश्नावर सर्वसामान्य जनजागृती मोहीम सुरू होती.*
      *2017 ला मा.मुंबई उच्च न्यायालयाने विहीर दुर्वे केस निकाल जो मा.न्यायाधीशांना पेंशन मिळाल्याचा न्यायनिर्णय आला या प्रकरणाची दखल वर्ग ड कर्मचारी महासंघ पदाधिकारी यांनी जबाबदारी स्वीकारली आणि संवैधानिक प्रवास सुरु झाला तत्कालीन अध्यक्ष मा.विठ्ठल कुलकर्णी सर यांचे सोबत संवाद झाला की, आपन जुनी पेंशन मध्ये आहात आम्हा DCPS/ NPS कर्मचाऱ्यांचे काय? या दरम्यान मा.अध्यक्ष विठ्ठल कुलकर्णी सर व इतर पदाधिकारी यांच्या समन्वयातून निवेदन दाखल करण्याचा निर्णय झाला पुढे इतर महासंघ प्रतिनिधी यांना विचारणा केली असता NPS प्रश्नावर गांभीर्य नसल्याने दि.27/07/2018 ला निवेदन आणि पुढे अभ्यासपूर्ण पद्धतीने अधीवक्ता यांच्या मार्गदर्शनात सशक्त याचीका दाखल करण्यात आली.*
          *NPS प्रश्नावर पेंशन फायटर कर्मचारी आजच कार्यरत नसुन मागील दहा वर्षांपासून विविध पद्धतीने कर्मचारी हितासाठी कार्यरत आहोत प्रत्येकाला आप आपल्या पद्धतीने कार्य करण्याची मुभा आहे कुणी एखाद्यी व्यक्त, संघटना सकारात्मक होऊन काम करत असेल तर त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.आज NPS चा प्रदीर्घ काळ सोळा वर्षे निघून गेलीत कालपर्यंत NPS विषयावर सक्रीय कार्य करणारे अल्प होते पंरतु जे निरंतर कार्य करत आहे त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे सुद्धा गरजेचे आहे.*
   *औरंगाबाद याचीका मा.विठ्ठल कुलकर्णी सर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात 2018 ला बिज रोपण केले आणि मा.भाऊसाहेब झालटे सर यांनी खतपाणी घातले आणि भविष्यात जुनी पेंशन रुपी फळे निश्चितच सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना चाखायला मिळणार आहेत हे निश्चित!*
       *मा.उच्च न्यायालयाने आजपर्यंत आपला पुर्ण वेळ दिला आहे सोबतच कर्मचारी व महासंघ पदाधिका-यांनी आपळा वेळ पैसा परीश्रम दिले आहे. याचिका  मा.शेट्टी कमीशन,MCSR,विविध सायटेशन, मा.न्यायाधीशांना पेंशन मिळाले तो न्यायनिवाडा, शासन निर्णय तसेच महासंघ नोंदणी MCSR Rule 29 या सर्व आधारावर याचीका भक्कम पणे अभी आहे आणि कर्मचारी हितार्थ संघटन,महासंघ द्वारे आपल्या मागण्या मागणे सकारात्मक आहे.*
        *महासंघ मागील कित्येक वर्षांपासून अविरतपणे कर्मचारी हिताकरीता कार्यरत आहे. औरंगाबाद NPS याचीका संवैधानिक व कायदेशीर बाबीने परीपूर्ण आहे याचीका दाखल करतांना मा.अध्यक्ष विठ्ठल कुलकर्णी सर यांनी इतर कर्मचारी समन्वयाचा प्रयत्न केला यांना त्यावेळी कुणीही प्रतिसाद दिला नाही आज NPS प्रश्नाला सोळा वर्षे झालीत कर्मचाऱ्यांत जागृती निर्माण करणे गरजेचे आहे सोळा वर्षे गेलीत आम्ही आणखी किती वर्ष वाया घालवणार आहोत? आपण आपल्या सर्व कर्मचा-यांच्या हित व जुनी पेंशन मिळणे करीता सर्वांनी सकारात्मक होऊन संवैधानिक मार्गाने पुढे जाणे गरजेचे आहे आणि वरील कार्य करीत असतांना कुणाला दोषी न ठरवता, कुणाची कुरघोडी न करता, कुणावर शिंतोडे न उडवता कर्मचारी हिताचेच ध्येय उद्देश्य ठेऊन प्रत्येक कर्मचाऱ्यने कार्य करणे गरजेचे आहे.*

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?